Next
अनुष्का शर्मा उभारणार पशुवैद्यकीय रुग्णालय
रत्नागिरीत घेतलेल्या जागेवर लवकरच होणार काम सुरू
BOI
Thursday, February 28, 2019 | 05:59 PM
15 0 0
Share this article:

अनुष्का शर्मामुंबई : पाळीव प्राण्यांबद्दल प्रचंड प्रेम असणारी अभिनेत्री अनुष्का शर्माने रत्नागिरीतील एका गावात पशूवैद्यकीय रुग्णालय उभारण्याचे ठरवले आहे. यासाठी तिला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच या गावात तिने घेतलेल्या जागेवर रुग्णालयाचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

अभिनेत्री अनुष्का शर्माचे प्राणी प्रेम सर्वांनाच परिचित आहे. लहानपणापासून आपल्याला प्राणी आवडतात, हे अनुष्काने अनेकदा उघडपणे सांगितले आहे. प्राण्यांविषयी तिला प्रचंड जिव्हाळा असून मुक्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा कोणीही पोहचवू नये यासाठी ती आग्रही असते. याच तिच्या भूमिकेतून ‘पेटा’ या पाळीव प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेने तिला ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’चा पुरस्कारही दिला आहे. 

दरम्यान अनुष्काने २०१६मध्ये रत्नागिरीतील एका गावात याच रुग्णालयासाठी जागा घेतल्याचे एका वृत्तपत्रातील वृत्ताने म्हटले आहे. जागेच्या वादामुळे रखडलेले हे काम आता मार्गी लागणार असून लवकरच या जागेवर प्राण्यांसाठीचे रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयाबरोबरच अनुष्का याठिकाणी भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी निवारा बांधणार असल्याचेही सांगितले जात आहे. 

या रुग्णालयाच्या जवळील काही जागेवर अनुष्का आपल्या वडीलांसाठी एक घरही बांधणार असून या रुग्णालयाची देखरेख तिचे वडील करणार असल्याचे सुत्रांकडून समजले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search