Next
कर्जवसुलीवर बँक ऑफ महाराष्ट्रचा भर
प्रेस रिलीज
Monday, August 06, 2018 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांनी बँकेचे आर्थिक निकाल जाहीर केले.या वेळी बँकेचे सरव्यवस्थापक आर. बी क्षीरसागर व व्ही. पी. श्रीवास्तव उपस्थित होते.

पुणे : ‘कर्जवसुली आणि मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्यावर प्रामुख्याने बँकेने लक्ष केंद्रीत केलेले असून, जून २०१८ला संपलेल्या तिमाही अखेरीस बँकेने रुपये ८५८ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली केली आहे. कर्जाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे ही परिणामकारक वसुली शक्य झाली आहे. याच काळात गतवर्षीच्या तुलनेत निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये २३.९२ टक्क्याची वृद्धी बँकेने केली आहे’, अशी माहिती ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने नुकतेच आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाही अखेरचे बँकेचे आर्थिक निकाल जाहीर केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बँकेचे सरव्यवस्थापक आर. बी क्षीरसागर व व्ही. पी. श्रीवास्तव उपस्थित होते.

बँकेच्या आगामी विकास योजनेसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, ‘कर्ज वितरण वाढवण्यासाठी आम्ही रिटेल, कृषी, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रांवर लक्ष केंद्रीत केले असून, आमच्या मालमत्ता विभागाच्या पूनर्संतुलनाच्या प्रक्रियेलाही गती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी भारत सरकारद्वारा सुरू केलेल्या सुधारणा कार्यक्रमांकरिता आमची बँक वचनबद्ध आहे. आगामी तिमाहीमधे त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील.’ 

‘३० जून अखेर संपलेल्या तिमाहीसाठी बँकेचा निव्वळ तोटा गतवर्षीच्या याच कालावधीत ४१२.२० कोटी रुपयांच्या तुलनेत १,११९ कोटी रुपये झाला आहे. ३१ मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत तो ११३.४९ कोटी होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न २३.९२ टक्क्यांनी वाढून ८५८.४९ कोटी रुपये झाले आहे. तिमाहीसाठी कार्यान्वयन नफा जून २०१७ तिमाहीच्या ५३३.४८ कोटींच्या तुलनेत ४७०.३२ कोटी झाला आहे.तिमाहीसठी व्याजावरील खर्च गतवर्षीच्या याच काळासाठी तुलनेत १३.१६ टक्क्यांनी कमी होऊन १७८२.०६ टी इतका झाला आहे. व्याजेतर उत्पन्न गतवर्षीच्या याच काळातील ४६४.९५ कोटीच्या तुलनेत ३४६.५५ कोटी झाले आहे. व्याजेतर उत्पन्नातील ही तफावत प्रतिकूल व्याजदर परिस्थितीमुळे, कमी मुल्याने झालेल्या १०४ कोटी रकमेच्या गुंतवणुकीच्या विक्रीतील नफ्याचे प्रमाण घटल्याने झाली आहे. थकीत कर्जाच्या वसुलीत बँकेने लक्षणीय कामगिरी केली असून, त्यात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ३९ टक्के वाढ होऊन ११२४ कोटींची वसुली झाली आहे. एकूण एनपीए २१.१८ टक्के, तर निव्वळ एनपीए १२.२० टक्के आहे. कर्जासंबंधी केलेल्या तरतुदींचे गुणोत्तर ३१ मार्च २०१७ मधील ४७.३२ टक्क्यांच्या तुलनेत १५ टक्यांनी वाढून ३० जून, २०१८ अखेर ६२.१९ टक्के झाले आहे’, असेही राऊत यांनी नमूद केले. 

‘बँकेचा एकूण व्यवसाय दोन लाख १९,४५८.३३ कोटी रुपये झाला आहे. एकूण ठेवी एक लाख ३५,४१०.८५ कोटी तर एकूण कर्जे चौऱ्याऐंशी हजार ४७.४८ कोटी आहेत. बँकेच्या वाहन कर्ज प्रकारामधे ३७.३७ टक्के इतक्या झालेल्या वृद्धीमुळे किरकोळ कर्ज व्यवसायात वार्षिक आधारावर ४.०५ टक्क्यांनी वाढ झाली असून, १६ हजार ७६७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. किरकोळ कर्जाचा हिस्सा १९.९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एकूण ठेवीच्या तुलनेत कासा ठेवींचे प्रमाण ४६.५३ टक्के झाले आहे आणि वार्षिक आधारावर त्यात ४.१५ टक्के वृद्धी झाली आहे’, असेही त्यांनी सांगितले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search