Next
मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती
BOI
Thursday, October 26 | 12:09 PM
15 0 0
Share this story

विद्यार्थी दशा ही संपूर्ण आयुष्याचा पाया समजली जाते. या काळात मुलांची जडणघडण होत असते. त्यामुळे या वयात मुलांची बुद्धिमत्ता विकसित झाली, तर आयुष्याचा पाया मजबूत होऊ शकतो. मनोज अंबिके यांनी बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या २१ पद्धती या पुस्तकात सांगितल्या आहेत.

मुलांच्या मेंदूचा संपूर्ण विकास, हायपर मुलांच्या ऊर्जेचे नियोजन, प्रश्नांमधून बुद्धीचा विकास, मुलांचा वैचारिक, भावनिक विकास अशा प्रकरणांमधून त्यांनी या विषयावर प्रकाश टाकला आहे. मुलांचा स्वभाव ओळखा आणि त्यांना अपंग बनवू नका, असा सल्ला ते पालकांना देतात.

आदर, विनयशीलता, धाडस, वक्तृत्व, सादरीकरण, श्रवण, निर्णयक्षमता हे गुण मुलांना कसे शिकवावेत याचेही मार्गदर्शन करतात.

प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पाने : २४८
किंमत : २५० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link