Next
कर्मचारी, कामगारांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक
राज्य कामगार आयुक्त कार्यालयाने केले स्पष्ट
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 03:00 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुले आदी ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांना भर पगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत देणे बंधनकारक आहे,’ असे राज्याचे कामगार आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात आलेली आहे. अशी सुट्टी किंवा सवलत मिळत नसल्यास आपले नाव, मतदान क्षेत्राचा तपशील, काम करत असलेल्या आस्थापनेचे पूर्ण नाव, पत्ता व दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, आस्थापना मालक किंवा व्यवस्थापकाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी, दूरध्वनी क्रमांक या तपशीलासह महानगरपालिकेतील संबंधित प्रभागातील विभाग कार्यालयातील दुकाने कक्ष तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

तक्रार करण्यासाठी संपर्क : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख सुविधाकार- (०२२) २४३१ १७५१
पत्ता : कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई.
दूरध्वनी क्रमांक : (०२२) २६५७ ३८३३, २६५७ ३८४४ 
औद्योगिक क्षेत्राच्या संबंधातील तक्रारींंसाठी पत्ता : संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, पाचवा मजला, सी-२०, ई- ब्लॉक, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई.
दूरध्वनी क्रमांक : (०२२) २६५७ २५०४, २६५७ २५०९.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search