Next
भारतातील सिनेमा थिएटरला नवा आयाम
प्रेस रिलीज
Monday, June 04, 2018 | 01:56 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ग्राहकांना नाविन्यपूर्ण व सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सॅमसंग इंडिया या देशातील सर्वात विश्वासार्ह कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने जगातील पहिला ऑनिक्स सिनेमा एलईडी स्क्रीन भारतात आणून सिनेमा पाहण्याच्या पद्धतीला नवा आयाम दिला आहे.

याविषयी बोलताना ‘सॅमसंग’च्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स एन्टरप्राइज बिझनेसचे उपाध्यक्ष पुनीत सेठी म्हणाले, ‘चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ व ग्राहक यांच्याकडून प्रगती थिएटर तंत्रज्ञानाची मागणी वाढत असल्याने सॅमसंगने भारतात थिएटर प्रोजेक्शन सिस्टीमऐवजी एलईडी स्क्रीन हा लक्षणीय अवलंबण्याचा निर्णय घेतला. मोठे बदल घडवणारे तंत्रज्ञान आम्ही सादर करत असून, त्यामुळे दिग्दर्शकांना त्यांचे काम त्यांना अपेक्षित असलेल्या व उत्तमोत्तम गुणवत्तेने दर्शवता येईल; तसेच चित्रपटप्रेमींनाही यामुळे प्रत्येक पैलूच्याबाबतीत नवा अनुभव मिळेल.’

याच नावाच्या जेमस्टोनने प्रेरित असलेल्या ऑक्सिन स्क्रीनमध्ये उत्कृष्ट चित्र दाखवण्याची क्षमता आहे आणि त्यातील काळ्या रंगामुळे चित्र अधिक ठाशीव व अचूक दिसते. त्यामध्ये ऑनिक्स व्ह्यू, ऑनिक्स थ्रीडी व ऑनिक्स साउंड अशी सर्वंकष सोल्यूशन आहेत.

इन्फिनिट काँट्रास्ट व स्पेशलाइज्ड लो-टोन ग्रेस्केल सेटिंग्स यांची सांगड असलेल्या ऑनिक्स व्ह्यूमुळे अधिक ठळक व अधिक तपशीलवार तपशील दिसतो. स्क्रीनमुळे सिनेमाला एचडीआर (हाय डायनॅमिक रेंज) मिळते, त्यामुळे स्क्रीनवरील कंटेंट शक्य तितका ठळक दिसतो. सर्वसाधारण सिनेमा प्रोजेक्टर्सच्या (१४६एफएल वि. १४एफएल) तुलनेत हे प्रमाण १० पटीने अधिक असतो, तसेच त्यामध्ये एकसमानता अधिक असते व ऑप्टिकल डिस्टॉर्शन व हस्तक्षेप नसतो. विविध आकारांमध्ये उपलब्ध असलेला हा या क्षेत्रातील पहिला डीसीआय-प्रमाणित सिनेमा स्क्रीन आहे. तंत्रज्ञानामुळे चित्र उत्कृष्ट दिसते, तांत्रिक कामगिरी वधारते व पारंपरिक प्रोजेक्टर-आधारित कार्यापेक्षा विश्वासार्हता अधिक असते.

ऑन-स्क्रीन कंटेंट कसाही असला, तरी स्क्रीन आजूबाजूच्या प्रकाशात आपल्या प्रेझेंटेशन क्षमता कायम ठेवते आणि आपले थिएटर कॉर्पोरेट कार्यक्रम, कॉन्सर्ट, क्रीडा उपक्रम पाहणे व गेमिंग स्पर्धा यासाठी वापरणाऱ्या युजरना समाविष्ट करून घेतो.

थ्रीडी ऑनिक्स सिनेमा एलईडी स्क्रीनमध्ये वाढीव ब्राइटनेस व सातत्यपूर्ण कलर अम्प्लिफिकेशन यामुळे थ्रीडी मूव्ही कंटेंट अधिक वास्तववादी दिसतो. चष्मा घातलेल्या प्रेक्षकांना आता अतिशय सुस्पष्टता व अंधार, अस्पष्ट सावल्यांपासून मुक्तता, तसेच सबटायटल टेक्स्ट, इमेजेस व किरकोळ व्हिज्युअल तपशील असे फायदे मिळतील.

स्क्रीनमध्ये हर्मन इंटरनॅशनल व सॅमसंगची ऑडिओ लॅब यातर्फे अद्ययावत ऑनिक्स थिएटर्समध्ये ऑनिक्स सराउंड साउंडही उपलब्ध असून, त्यामुळे स्पष्ट व सातत्यपूर्ण ऑडिओच्या माध्यमातून सिनेमातील दृष्य अधिक जिवंत होतात. या वैशिष्ट्यामुळे ऑडिओ ‘स्वीट स्पॉट’ विस्तारून रिअरवर्ड बायस कमी केला जातो आणि व्यक्ती कोठेही बसल्या, तरी सर्वांना सदैव एकसमानच अनुभव मिळतो.

थिएटरनी आपले स्क्रीन अपग्रेड करून ऑनिक्स स्क्रीन बसवले असल्याने, आगामी चित्रपट डिस्प्लेवर उत्तम दिसावेत म्हणून सॅमसंगने सिनेमा कंटेंट डेव्हरपर्स व सिनेमा टेक्नालॉजी सोल्यूशन देणाऱ्यांशी सहयोग केला आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link