Next
‘कटेरा’ कंपनीसोबत ‘केइएफ इन्फ्रा’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Saturday, June 23 | 03:36 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील आघाडीची ऑफसाइट इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ‘केइएफ इन्फ्रा’ने अमेरिकेतील डिझाइन आणि कन्सट्रक्शन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ‘कटेरा’ या टेक्नोलॉजी कंपनीसोबत व्यापार विस्ताराची नुकतीच घोषणा केली. दोन्ही  कंपनीच्या उत्पादन क्षमतेला याचा प्रचंड फायदा होईल. सध्या नॉर्थ अमेरिका आणि भारतात ३.७ बिलियन डॉलर्सचे बुकिंग कटेरा कंपनीचे आहे.

‘या व्यावसायिक भागीदारीमुळे मी अत्यंत आनंदी असून, सारखी विचारधारा असलेल्या टीमसोबत काम करताना भविष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे’, अशी प्रतिक्रिया या वेळी ‘केइएफ इन्फ्रा’चे संस्थापक आणि अध्यक्ष फैजल कोट्टीकॉलोन यांनी व्यक्त केली.

‘कटेरा’ कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक मायकल मार्क्स म्हणाले ‘केइएफ इन्फ्रासारख्या कंपनीशी जुळणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमची मुल्ये, तत्त्वे आणि दृष्टीशी इतकी जवळ येणारी टीम आम्हाला मिळणे हे आमचे भाग्य आहे.’

‘कटेरा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल मार्क्स असून, ही कंपनी जागतिक स्तरावर कार्यरत आहे. ‘कटेरा’चे जगभरात दोन कारखाने आणि दोन हजार कर्मचारी आहेत. युएसडी १.१ डॉलर्सचे टर्नओव्हर आहे. ‘कटेरा’च्या गुंतवणुकदारांमध्ये सॉफ्टबँक, फॉक्सकॉन आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इनव्हेस्टमेंट बोर्ड यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link