Next
‘कल्याणी स्कूल’तर्फे ‘किड्स फॉर टायगर्स’ उपक्रम
BOI
Thursday, July 25, 2019 | 05:56 PM
15 0 0
Share this article:


पुणे : वाघांचे संरक्षण आणि पर्यावरणाची हानी रोखणे याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारा ‘किड्स फॉर टायगर्स’ हा शैक्षणिक उपक्रम  कल्याणी स्कूलमध्ये सुरू करण्यात आला आहे. नुकतेच याचे शाळेत पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. वन्यजीवन प्रेमी आणि पर्यावरणीय कार्यकर्ते बिट्टू सहगल यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. भारतातील ग्रामीण आणि शहरी मुलांसाठी निसर्गातून भटकंती, विविध उत्सव आणि कार्यशाळा याद्वारे हा उपक्रम राबवला जातो. 
 
या कार्यक्रमास प्रख्यात बाल कथाकार, निसर्गप्रेमी दीपक दलाल, बिट्टू सहगल, डॉ. परवेश पंड्या, बिक्रम ग्रेवाल आणि मधु भटनागर यांची उपस्थिती लाभली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळा कसे बदल घडवून आणू शकेल, यावर दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले.  


डॉ. परवेश पंड्या आणि बिट्टू सहगल यांनी ‘निसर्गाचे म्हणणे ऐका’ या दृकश्राव्य स्वरुपाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. बिक्रम ग्रेवाल यांनी प्रेक्षकांना भारतातील विविध पक्षी व प्राणी यांच्या प्रजातींची झलक दाखवली. त्यांनी अमूर फाल्कन पक्षाची शिकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागालँडच्या कार्यकर्त्यांच्या कामाची माहिती दिली. पृथ्वीचे दर सेकंदाला काही प्रमाणात नुकसान करणाऱ्या पर्यावरणविषयक संकटांबद्दल मधू भटनागर यांनी चिंता व्यक्त केली. यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात पाहुण्यांनी सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. या वेळी वाघ वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशा आशयाच्या निवेदनावर अतिथी व प्रेक्षकांनी स्वाक्षऱ्या केल्या.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search