Next
आता सेंद्रीय कपडेही बाजारपेठेत दाखल
प्रेस रिलीज
Saturday, May 26 | 04:08 PM
15 0 0
Share this story

‘सोल स्पेस’ ब्रँडची माहिती देताना लिव्हिंग ग्रीन फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रजत जयपुरीया
पुणे :  आतापर्यंत सेंद्रीय भाजीपाला, फळे, धान्य सर्वांना माहित होते; पण आता सेंद्रीय कापसापासून बनलेले कपडेही उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे असे कपडे देशात प्रथम पुण्यात उपलब्ध झाले आहेत. 

सेंद्रीय कापसापासून कपडे तयार करणाऱ्या ‘सोल स्पेस’ या ब्रँडने देशातील आपले पहिले  रीटेल आऊटलेट पुण्यात सुरु केले आहे. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत हा ब्रँड मुंबई,बंगळुरु व हैदराबादमध्येही पदार्पण करणार आहे. सोलस्पेसचे मिंत्रा,जबाँग व अॅकमेझॉन या पोर्टल्सवर भक्कम ईकॉमर्स अस्तित्व असून, स्वतःचे ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट मायसोलस्पेस डॉट इन’ (www.mysoulspace.in.) हे संकेतस्थळही आहे. या ब्रँडने देशभरात आर्थिक वर्ष २०१९-२० अखेरपर्यंत आणखी २० स्टोअर्स उघडण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या मालकीच्या स्टोअर्सखेरीज फ्रँचायझी प्रारुपाद्वारेही देशपातळीवर विस्तार साधला जाणार आहे. 

‘सोल स्पेस हा पहिलाच सेंद्रीय फॅशन ब्रँड आहे. तो पर्यावरण सुरक्षित आणि किफायती कपड्यांची निर्मिती करतो. पुरुष व स्त्रिया या दोघांसाठीही या ब्रँडने रुप खुलवणारा सुंदर वस्त्रांचा संग्रह इसेन्शियल्स, स्टुडिओ व थलेजर अशा तीन श्रेणींमध्ये सादर केला आहे. या कपड्यांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते’, असे लिव्हिंग ग्रीन फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रजत जयपुरिया यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘इसेन्शियल्स श्रेणीतील कपडे दिसण्यास सुंदर व आतून वापरण्यास सुखावह आहेत. स्टुडिओ कलेक्शनमध्ये योगा व परफॉर्मन्स वेअर कपडे असून, ‘लवचिक राहा’ (बी फ्लेक्झिबल) हे तत्त्व आहे. आरामदायी, स्टायलिश व साधे तरीही फॅशनेबल असे कपडे पुरवण्याचे तत्त्वज्ञान बाळगून या ब्रँडने आधुनिक अभिनवता व आकर्षकतेचा संगम साधून हे कपडे सादर केले आहेत. कामानंतर व्यायाम करायचा असो किंवा व्यायामानंतर काम करायचे असो, हे कपडे अत्यंत सोईस्कर ठरतात. थलेजर या खास फॅशनच्या कपड्यांमागे ‘जगाला पुढे न्या’ (मूव्ह द वर्ल्ड) ही संकल्पना आहे. या ट्रेंडी कपड्यांखेरीज ‘सोल स्पेस’ने महिलांसाठी हातमागावर विणलेले ड्रेस व मुलांच्या कपड्यांचाही संग्रह उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.’

‘‘सोल स्पेस’ प्रकल्प भारतात असून, यासाठी आवश्यक  सेंद्रीय कापसाची लागवडही भारतात करण्यात आली आहे. तेलंगणा, ओरिसा आणि महाराष्ट्रात या कापसाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात यवतमाळ येथे अशा कापसाची लागवड शेतकरी करत आहेत. सर्वात जास्त प्रमाण ओरिसात आहे’, असेही जयपुरिया यांनी सांगितले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link