Next
पुण्याचा फहद खान अमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंगमध्ये सहावा
प्रेस रिलीज
Monday, October 23 | 05:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील फिटनेस ट्रेनर फहद खान याने अमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये १८१ सेमी प्लस या गटात सहावे  स्थान पटकावले असून या गटात सहा अंतिम स्पर्धकांमध्ये स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. प्रथमच भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या यशाविषयी बोलताना फहद  म्हणाला,  ‘मला या स्पर्धेसाठी सतत ८ महीने जबरदस्त   तयारी करावी लागली. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये माझा कार अपघात झाला, त्यामुळे मला सहा महिन्यासाठी वेटलिफ्टिंग तालमीपासून रजा घ्यावी लागली. या परिस्थितीतून बाहेर पडणे खूप  कठीण होते. कारण या अपघातानंतर वजन उचलताना मला धाप लागायची. प्रयत्नपूर्वक मी पुन्हा वेटलिफ्टिंग सुरू केले आणि इतर काही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो.यापुर्वी मी ‘बॉडी पावर एक्स्पो २०१५’ या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात १० अंतिम स्पर्धकामध्ये माझा समावेश झाला होता. या यशाचे संपूर्ण श्रेय माझे प्रशिक्षक उमेश मोहिते यांना आहे. मोहिते स्वतः अनेक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी भाग  घेतलेला आहे.  या स्पर्धेच्या तयारीसाठी तर ते माझ्यासाठी मोठा आधार होते’.
 
अमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेची संकल्पना १९६५ मध्ये जो वील्डर यानी मांडली. विविध गटात आणि प्रकारात या स्पर्धा घेतल्या जातात. अमॅच्युअर ऑलिंपिया हे टायटल जिंकण्यासाठी ४० देशांच्या २०० स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link