Next
कॉसमॉस बँकेच्या दीर्घ मुदत ठेव योजनेला उत्तम प्रतिसाद
प्रेस रिलीज
Tuesday, March 27 | 11:21 AM
15 0 0
Share this story

मिलिंद काळे, कॉसमॉस बँक अध्यक्षपुणे : ‘कॉसमॉस को ऑपरेटिव्ह बँके’च्या दीर्घ मुदत ठेव योजनेला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेसाठी एकशे ४५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दीष्ट कामकाजाच्या केवळ पाच दिवसात पूर्ण झाले. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या दीर्घ मुदत ठेव योजनेतील ठेवी संकलित करण्यात आल्या. 

१६ मार्च रोजी जाहीर केलेल्या या मुदत ठेव योजनेसाठी, ८.५० टक्के व्याजदर देण्यात आला होता व योजनेचा कालावधी ६६ महिने होता. 

‘विक्रमी वेळेत या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, ग्राहकांनी पुन्हा एकदा बँकेवरील आपला विश्वास दृढ असल्याचे सिद्ध केले आहे,’ असे मत बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी व्यक्त केले. ठेवीदारांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि बँकेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे, ठेवीदारांचे मनापासून आभार मानले आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link