Next
‘घरांच्या विक्रीत तुलनात्मक वाढ’
बर्लिन क्रेडाई नॅशनल परिषदेत तज्ज्ञांचे मत
प्रेस रिलीज
Tuesday, August 14, 2018 | 06:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘गेले अनेक महिने मंदीच्या सावटाखाली असणारे बांधकाम क्षेत्र आता कात टाकत आहे. मागील वर्षांचा आढावा घेता प्रमुख सात शहरांमध्ये उभारण्यात येत असलेल्या घरांच्या विक्रीत तुलनात्मक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातही घरांच्या विक्रीत अल्प वृद्धी झाली आहे. यामुळे विकासकांमध्ये नवी आशा निर्माण होत आहे’, असे मत बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. नुकत्याच बर्लिन येथे झालेल्या ‘क्रेडाई नॅशनल’च्या १८ व्या वार्षिक तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत हा निष्कर्ष मांडण्यात आला.  

 या वेळी ‘क्रेडाई-जेएलएल’, ‘क्रेडाई-कुशमन आणि वेकफील्ड’ यांचे अहवाल प्रसिद्ध करण्यात आले. ‘क्रेडाई-जेएलएल’च्या अहवालानुसार, घरांच्या विक्रीत २५ टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 
‘क्रेडाई-कुशमन आणि वेकफील्ड’च्या अहवालात बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीत दहा हजार ८० कोटी रुपयांइतकी वाढ झाली असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. या परिषदेत ‘क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष जाक्षेश शहा, उपाध्यक्ष सतीश मगर, ‘क्रेडाई महाराष्ट्रा’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्यासह एक हजारपेक्षा अधिक सदस्य, विकसक आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ व्यावसायिक आणि उद्योजक सहभागी झाले होते. 

शांतिलाल कटारिया
 ‘परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला ‘क्रेडाई महाराष्ट्रा’ने कायमच प्रोत्साहन दिले असून, त्याचा बांधकाम क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होत आहे;तसेच सरकारनेही अशा प्रकल्पांच्या निर्मितीवर विशेष सवलत दिल्याने त्याचा आगामी काळात निश्चितच फायदा होणार आहे’,असे  ‘क्रेडाई महाराष्ट्रा’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले. 

‘‘क्रेडाई-जेएलएल’च्या अहवालाप्रमाणे, गुंतवणूकीशी संबंधित रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढती मागणी दोन घटकांवर आधारित असू शकते. ‘रेरा’च्या अंमलबजावणीमुळे खरेदीदारांचा आत्मविश्वास प्रथमच वाढला आहे. दुसरी बाब म्हणजे बहुतांश राज्यांत भांडवली मूल्यांकन स्थिर ठेवल्याने घर खरेदीला मागणी वाढताना दिसत आहे. मुंबईत सर्वाधिक मागणी वाढली असून, त्या खालोखाल बंगळुरूमध्येही घरांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातही दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे’, असेही कटारिया यांनी सांगितले. 

सतीश मगर
‘क्रेडाई’ने आपले लक्ष्य समोर ठेवूनच कायम आपली वाटचाल केली आहे. सर्वाधिक रोजगार निर्मिती देणाऱ्या या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ‘क्रेडाई’ कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेच्या या दृष्टिकोनातूनमुळेच बांधकाम क्षेत्राला पुनरुज्जीवन मिळण्यास मदत झाली असून, भविष्यासाठी एक मजबूत पाया ‘क्रेडाई’ने रचला आहे. या क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणे आणि या क्षेत्राला भेडसावणारे प्रश्न आघाडीवर आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे ही परिषद आहे’, असे मत सतीश मगर यांनी व्यक्त केले. 

बांधकाम क्षेत्रातील अनेक विषयांवर विस्तृत चर्चा या परिषदेत झाल्याने ही परिषद फलदायी ठरली असल्याची भावना उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search