Next
‘अर्बन फुटपाथ’मुळे सनसिटी रस्ता परिसर होणार ‘स्मार्ट’
प्रेस रिलीज
Monday, December 31, 2018 | 03:24 PM
15 0 0
Share this storyपुणे : येत्या काही दिवसांत सनसिटी रस्ता परिसर अधिक स्मार्ट होण्याच्यादृष्टीने ‘अर्बन फुटपाथ’ (शहरी पदपथ) हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे २०१६ पासून शहरात ‘पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व येथील पदपथाला अद्ययावत स्वरूप देण्यात आले. या प्रकल्पाचे पुणेकरांनी कौतुक केल्याने महापालिकेने असाच प्रकल्प शहरातील इतर भागांमध्येही राबविण्यास सुरुवात केली आहे. सध्या सिंहगड रस्ता, सिम्बॉयसिस कॉलेज, सातारा रस्ता या ठिकाणी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

शहरातील इतर भागांतून सिंहगड रस्ता परिसरात स्थलांतरित होणाऱ्यांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन निवासी प्रकल्पांच्या आकर्षक मांडणीतून या परिसराचा चेहरा मोहरा काही प्रमाणात बदलला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकासकामांच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प सनसिटी रस्ता परिसरात हाती घेण्यात आला आहे.

नागपुरे यांनी हा प्रकल्प सनसिटी रस्ता परिसरात राबविण्यासाठी, तसेच इतर अनेक विकासकामांसाठी पालिकेमध्ये सातत्याने पाठपुरावा केला आहे. परिसरातील जेष्ठ नागरिक, शाळकरी, तसेच महाविद्यालयीन युवक व कर्मचारी या सगळ्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या उपयोगी पडेल असा ‘अर्बन फूटपाथ’ साकारण्यात येत आहे.

‘अर्बन फुटपाथ’वर चालण्याच्या प्रसन्न अनुभवाबरोबरच यावरून सायकलिंगदेखील करता येणार; तसेच बसण्यासाठी आकर्षक पद्धतीचे बाकडे बसवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सनऑर्बिटच्या समोरून पुढे ८०० मीटर अंतरापर्यंत अशा स्वरूपाचा पदपथ साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून, लवकरच तो नागरिकांना वापरासाठी खुला करण्यात येईल. या कामासाठी नगरसेविका नागपुरे यांनी नगरसेविका विकासनिधीतून तब्बल एक कोटी रुपयांची मंजुरी पालिकेकडून मिळवली आहे. संपूर्ण सिंहगड रस्त्यावरील हा पहिलाच प्रकल्प आहे. सायकल ट्रक, आकर्षक लँडस्केप, वेगळ्या स्वरूपाची आसनव्यवस्था या अद्ययावत सुविधा यात देण्यात आल्या आहेत.

याविषयी बोलताना नगरसेविका नागपुरे म्हणाल्या, ‘सध्या रस्त्यांची रुंदी वाढली असूनही वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जेष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणे, तसेच सायकलिंग करणे फारच जिकरीचे झाले आहे. या सगळ्यांचा विचार करता आपल्या परिसरातही जेएम रोडप्रमाणे ‘अर्बन फुटपाथ’ असे वाटले. यासाठी वेळोवेळी पालिकेत प्रश्न उपस्थित केले, सातत्याने मागणी केली. अखेर माझ्या प्रयत्नांना यश आले व आपल्या परिसरात प्रथमच ‘अर्बन फुटपाथ’ साकारला जात आहे. आता असलेल्या सोयी-सुविधांमध्ये भविष्यात ओपन जिम व वायफायची अद्ययावत सुविधाही देण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link