Next
नाशिक विभागात निवडणूक यंत्राविषयी जनजागृती
BOI
Wednesday, January 16, 2019 | 01:17 PM
15 0 0
Share this article:

मतदार जनजागृतीचा आढावा घेऊन मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक बघताना महसूल आयुक्त डॉ. राजाराम माने. शेजारी उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, तहसीलदार बबन काकडे आणि महसूल आयुक्त कार्यालयातील अधिकारी.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान प्रक्रिया समजून घेऊन जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात मतदान यंत्राविषयीचा जनजागृती आढावा महसूल आयुक्त डॉ. राजाराम माने, उपायुक्त रघुनाथ गावडे, उपायुक्त दिलीप स्वामी, तहसीलदार बबन काकडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घेतला. नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाचही जिल्ह्यांमध्ये सध्या मतदान आणि मतदान यंत्राबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर चालू आहे. 

मतदानावेळी आपल्या नियोजित उमेदवाराच्या नावासमोर बटण दाबल्यास मतदान झाल्यानंतर सात सेकंदामध्ये आपण ज्या उमेदवाराला मतदान केले त्याच्या नावाची चिन्हासहीत चिठ्ठी मतदाराच्या डोळ्यादेखत पडणार आहे. यामुळे आपण मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान झाले किंवा नाही झाले हे मतदाराला समजणार आहे.

ही प्रक्रिया पाचही जिल्ह्यांतील मतदारांना ठिकठिकाणी समजावली जात असून, प्रत्यक्षात मतदान केल्यानंतर चिठ्ठीही मतदारांना दाखवली जात आहे. महसूल आयुक्त, उपायुक्त आणि तहसीलदार अधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी यासंदर्भातील माहितीविषयी मतदारांना मार्गदर्शन करत आहेत.

या विषयी सविस्तर माहिती देताना विभागीय महसूल आयुक्त डॉ. माने म्हणाले, ‘मतदार नोंदणी आणि जागृती ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया असून, प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी आम्ही व्हीव्हीपॅट म्हणजेच निवडणूक यंत्राविषयी जनजागृती करीत आहोत. मतदार यादीमध्ये नाव नसल्यास तातडीने मतदार यादीत नाव समाविष्ट करून घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी पाचही जिल्ह्यांमध्ये मतदारांना मतदान कसे करावे याविषयी प्रात्यक्षिके दिली जात असून, यामुळे लोकशाहीवरचा विश्वास बळकट होणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search