Next
‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’वर कार्यशाळा
प्रेस रिलीज
Tuesday, May 08 | 02:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : अमेरिकन कॉन्स्युलेटतर्फे ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा १७ मे रोजी पुण्यात होईल. यात बहुमाध्यम (मल्टी मीडिया) तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले मार्गदर्शन करतील. दामले यांनी कम्युनिकेशन टेकनॉलिजिमध्ये एमएस (अमेरिका) केले आहे. ते ‘फुलब्राइट स्कॉलर’ असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमधील एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत.

‘ही कार्यशाळा विनामूल्य असून, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे सोशल मीडिया विषयक काम करणाऱ्यांना या प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहता येणार आहे. कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, दूरध्वनीवर ११ मे २०१८ पर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. कार्यशाळेला येताना लॅपटॉप घेऊन यावा. प्रत्येक संस्थेतील दोनजणांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक सहभागींना प्रशस्तिपत्रक देण्यात येईल,’ अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link