Next
न्याहारीला हवा पिझ्झा आणि नूडल्स
‘यमलेन’च्या अहवालातील निरीक्षण
प्रेस रिलीज
Wednesday, December 19, 2018 | 05:35 PM
15 0 0
Share this article:


पुणे : न्याहारीसाठी आता लोक पिझ्झा आणि नूडल्सला पसंती देत असल्याचे धक्कादायक निरीक्षण ‘यमलेन’ या स्टार्टअपने नोंदवले आहे. न्याहारीसाठी पारंपरिक पोहे, मिसळ, उपमा, शिरा अशा पदार्थांऐवजी आता पुणेकरांची पसंती पिझ्झा आणि नूडल्सला मिळत आहे, असे ‘यमलेन’ने म्हटले आहे.

यमलेन हा हीट अँड ईट श्रेणीतील भारताचा पहिला सीपीजी स्टार्ट-अप आहे. यमलेनने अलीकडेच पुणे, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये सहा महिने सर्वेक्षण केले. यामध्ये ३५ ते ४४ वर्षे वयोगटातील लोक न्याहारीसाठी अनेकदा पिझ्झा घेत असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये ८३ टक्के लोक हे विवाहित, कुटुंबवत्सल आहेत. हे लोक आपल्या कुटुंबासह ‘हीट अँड ईट’ पिझ्झाचा आस्वाद घेतात.

या सर्वेक्षणातील निरीक्षणांबद्दल बोलताना यमलेनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश आहुजा म्हणाले, ‘भारतीय लोक नवनवीन पदार्थांची चव घेत आहेत. कामाचा वाढता तणाव, बदलती जीवनशैली आणि नवनवीन पदार्थांची चव घेण्याचे खुलेपण यामुळे हा बदल दिसून येत आहे. सध्याच्या गतिशील जीवनात आरोग्यदायक आणि सोयिस्कर खाद्यपदार्थांची मागणी वाढते आहे. एकंदर पारंपरिक आणि अपारंपरिक खाद्यपदार्थ उद्योगातील एक मोठा भाग असलेले ‘रेडी टू इट’ फूड मार्केट हे येत्या पाच वर्षात (२०१८ ते २०२३) २१ टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. ‘रेडी टू ईट’ आणि ‘हीट अँड ईट’ पदार्थ आता भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search