Next
भारत बिलच्या व्यवहारांत ७५ टक्क्यांनी वाढ
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 01:50 PM
15 0 0
Share this story

मुंबई : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सुरू केलेली भारत बिलपे ही एकाच ठिकाणी बिल पेमेंट सुविधा देणारी सेवा दरमहा अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या सुविधेने मार्च २०१८मध्ये ३१.५ दशलक्ष बिल पेमेंट व्यवहारांना सुविधा दिली आहे, तर मार्च २०१७मधील १८ दशलक्ष व्यवहारांच्या तुलनेत यंदा त्यात ७५ टक्के वाढ झाली आहे.

ग्राहकांना भारत बिलपे सुविधेद्वारे वीज, पाणी, डायरेक्ट-टू-होम (डीटीएच), टेलिकॉम (मोबाइल-पोस्टपेड, लँडलाइन-पोस्टपेड व ब्रॉडबँड), गॅस पाइपलाइन सुविधांसाठी पैसे भरता येतील. बिले भरण्यासाठी ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध असून, त्यामध्ये इंटरनेट बँकिंग, वेबसाइट, मोबाइल बँकिंग-मोबाइल अॅप किंवा किराणा दुकाने, एजंट, बीसी व बँकेच्या शाखा असे फिजिकल कलेक्शन पॉइंट यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग वॉलेट्स, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय), रोख असे विविध पर्यायही उपलब्ध आहेत. एकदा बिले भरून झाली की ग्राहकांना एसएमएस-ईमेल किंवा प्रिंटेड रिसिट या स्वरूपात तातडीन कन्फर्मेशन मिळते.

भारत बिल पेमेंट सिस्टीमचे चीफ प्रोजेक्ट ऑफिसर ए. आर. रमेश यांनी सांगितले, ‘ग्राहकांमध्ये भारत बिलपेचा स्वीकार केल्या जाण्याचे प्राथमिक कारण म्हणजे, भारतातील कोणतेही राज्य, शहर किंवा प्रदेशातील कोणत्याही बिलरला तातडीने व सुरक्षित बिल पेमेंट करता येतील. ग्राहकांना भारत बिलपे एनेबल्ड इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा भारत बिलपे एनेबल्ड वेबसाइट, अॅप, एजंट असिस्टेड कलेक्शन पॉइंट यांचा वापर करण्याचा पर्याय मिळतो. केवळ भारत बिलपे लोगो पाहून ग्राहकांना टच पॉइंट्स उपलब्ध होतात व त्यांना केव्हाही बिल भरता येतात. विविध अॅप वापरणे किंवा निरनिराळ्या वेबसाइटवर जाणे किंवा विविध कलेक्शन पॉइंट्सवर जाणे याऐवजी हा ब्रँड सर्व प्रकारची युटिलिटी बिले एकाच ठिकाणी भरण्याची सुविधा देतो. ग्राहकांना प्रत्यक्ष ठिकाणी जाण्यासाठी किंवा वेबसाइट पाहण्यासाठी लागणारा वेळ व पैसे वाचवता येतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link