
पुणे : एसओटीसी ट्रॅव्हलने वानोरी (पुणे) येथे नव्या स्टोअरचे उद्घाटन केले.
‘एसओटीसी’च्या दृष्टीने पुणे ही सक्षम बाजारपेठ असून त्यामध्ये दरवर्षी लक्षणीय प्रगती होत आहे. या बाजारातील जास्तीत जास्त क्षमता वापरण्यासाठी आणि ग्राहकांना टूरच्या आधी व नंतर उत्तम अनुभव देण्यासाठी एसओटीसी स्टोअर सुरू करायचे ठरवले. जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या हॉलिडेविषयक सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करता येऊ शकतात. उत्कृष्ट हॉलिडे पॅकेजेस बुकिंग करण्याबरोबरच, प्रवाशांना विविध डील व खास सवलतींचाही लाभ घेता येईल.
‘एसओटीसी’चे भारत व एनआरआय बाजारातील सेल्स हेड डॅनिअल डिसोझा यांनी सांगितले, ‘या अतिशय स्पर्धा असलेल्या व वाढत्या उद्योगामध्ये आमचा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ग्राहकांना मिळणारा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे असे आम्हाला वाटते. आमच्या ग्राहकांना उत्तमोत्तम हॉलिडे अनुभव मिळणे गरजेचे आहे. स्टोअरचे ठिकाण मोक्याचे व सोयीचे आहे. ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करून आम्ही त्यांना दर्जेदार सेवा देतो.’
बुकिंग करण्यासाठी पत्ता : एसओटीसी शॉप क्र. चार, ऑक्सफर्ड ब्लूज, साळुंके विहार रोड, केदारी नगर, वानोरी, पुणे – ४११ ०४०