Next
‘आतापर्यंत एकाही निवडणुकीत मतदान चुकवले नाही’
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितले मतदानाचे महत्त्व
प्रेस रिलीज
Wednesday, April 24, 2019 | 01:38 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘मी १८ वर्षांची झाल्यापासून मतदान करत आहे. त्यानंतर एकाही निवडणुकीत मी मतदान केले नाही असे झाले नाही, मग ती महानगरपालिकेची, विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीत मी न चुकता मतदान करते,’ असे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सांगितले. 

सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने या विषयाला अनुसरून ‘मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन’ या ९२.७ बिग एफएमवर अभिनेत्री आणि आरजे विद्या बालन यांनी रेणुका शहाणे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी मतदानाचे महत्त्व सांगून मनमोकळ्या गप्पा मारल्या.

मतदानाचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या, ‘एखाद्या मतदाराला कदाचित असे वाटू शकते, की एका मताने काहीच फरक पडणार नाही, पण एका मतानेही उमेदवार विजयी किंवा पराभूत होतो. मतदानामुळे नागरिकांना त्यांच्या आवडीचे सरकार निवडण्याचा अधिकारच मिळत नाही, तर आपल्यासारख्या लोकशाही देशात आपले मत व्यक्त करण्याची संधीही मतदाराला मतदानाच्या माध्यमातून मिळत असते. आपल्या देशाने दिलेले अधिकार आपण बिनधास्तपणे वापरतो; पण आपली कर्तव्य पार पाडताना, मात्र पळपुटेपणा करतो.’

‘माझ्या नवऱ्याचे मतदान ओळखपत्र मध्य प्रदेशातील आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीला तो तिथे जातो आणि त्याचे मतदान नीट होईल याची काळजी घेतो. माझा मुलगा आता १६ वर्षांचा आहे, दोन वर्षांनंतर त्याला मतदान करायची संधी मिळेल याबाबत तो खूप उत्सुक आहे. असाच उत्साह प्रत्येकात असायला हवा. प्रत्येकाच्या घराच्या जवळच मतदान केंद्र असतात. त्यामुळे कृपया घरातून बाहेर पडा आणि मतदानाचा आनंद अनुभवा. तुम्हाला रांगेत उभे राहावे लागेल, पण तुमचे मत व्यक्त करण्यासाठी तुम्ही तेवढेही करू शकत नसाल, तर येणारी पाच वर्ष तुम्हाला तुमचे मतच नसेल,’ असे त्यांनी सांगितले.

‘मुथूट ब्लू धून बदल के तो देखो विथ विद्या बालन’ हा ‘मुथूट फिनकॉर्प’तर्फे हा बिग एफएमवर सादर केला जाणारा नवा कार्यक्रम असून, यात समाजावर परिणाम करणारे मुद्दे सर्वांसमोर मांडले जातात. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत प्रक्षेपित होतो. शनिवारी व रविवारी त्याचे पुन:प्रक्षेपण केले जाते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search