Next
भिवंडीच्या ‘सहेली ग्रुप’तर्फे ऊबदार कपड्यांचे वाटप
मिलिंद जाधव
Friday, December 28, 2018 | 04:21 PM
15 0 0
Share this storyभिवंडी : ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसणारी थंडीची झळ लक्षात घेऊन भिवंडीतील जायंट्स ग्रुप ऑफ सहेली यांच्यातर्फे डोंगरपाडा आणि दह्याले जिल्हा परिषद शाळेतील मुलांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.

या वेळी जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा अलका जैन, ‘सहेली ग्रुप’च्या सर्व सभासद, प्रबुद्ध गायकवाड, केंद्रप्रमुख गजानन आसवारे, भिवंडी पंचायत समिती सदस्य राम मोरगा, काटई ग्रामपंचायत सदस्य भक्ती गोवेकर, योगिता पंडित, अशोक गायकवाड, विजेता विचार फाउंडेशनचे सचिव गणेश पाटील, खजिनदार विकास कुचन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरिता वाजे, उपाध्यक्षा सुशीला दिघे, मुख्याध्यापक शाम नवाळे उपस्थित होते.‘सहेली ग्रुप’च्या अध्यक्षा जैन यांनी डोंगरपाडा शाळेतील चार विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्याचे ठरवले. या वेळी १२५ आदिवासी विद्यार्थ्यांना जायंट्स ग्रुप सहेलीतर्फे स्वेटर, उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपणसुद्धा थंडीचे दिवस अनुभवले आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांना आम्ही स्वेटर्स देऊन मायेची ऊब दिली आहे,’ असे जैन यांनी या वेळी सांगितले.

या प्रसंगी विजेता विचार फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शाम नवाळे यांनी केले. शिक्षक अशोक गायकवाड यांनी आभार मानले.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ganesh Ghude About 81 Days ago
Very good job Jain madam and all team best of luck joints group...
0
0
Dhangar pushpa About 82 Days ago
Good work this the need of the society.
1
0

Select Language
Share Link