Next
राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सान्वी क्षेत्रीला सुवर्णपदक
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : मुंढवा-केशवनगर येथील सान्वी क्षेत्री हिने राजाराम भिकु पठारे स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ‘पुमसे’ क्रीडा प्रकारात सुवर्णपदक, तर किरोगी (फाइट) या प्रकारात रौप्यपदक मिळवत यशस्वी कामगिरी केली. होरांगी तायक्वांदो अॅकॅडमीतर्फे नुकतेच या स्पर्धेचे आयोजन केले होते.

सान्वी वयाच्या पाचव्या वर्षापासून तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असून, ती सध्या विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई  इंग्लिश शालेत पहिलीत शिक्षण घेत आहे. सान्वीने प्रांजल पानसे व अन्वी बांगर यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, गुवाहाटी, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली येथून स्पर्धक सहभागी झाले होते. देशांतर्गत एकूण दीड हजारांहून अधिक स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तीनवेळा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर असलेले सिद्धू क्षेत्री हे सान्वीचे वडील असून, त्यांच्याकडून ती या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link