Next
‘एनसीसी नेव्हल युनिट’तर्फे ‘कौकण शौर्य’ सागरी मोहीम
BOI
Saturday, January 12, 2019 | 12:31 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : टू महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटतर्फे ‘कौकण शौर्य’ ही शिडाच्या बोटींवरील सागरी मोहीम १५ ते २४ जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजित केली असून, भगवती बंदरातून या मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. या मोहिमेचे हे दहावे वर्ष आहे. यात छात्रसैनिक यांत्रिकी साधन नसताना शिडाच्या माध्यमातून भरती-ओहोटी, वार्‍याचा वेग, पाण्याचा विद्युत प्रवाह या सार्‍यांचा अभ्यास करून पाण्यावरील धाडस करणार आहेत.

या मोहिमेचे नेतृत्व करणारे युनिटचे कमांडर आलोक लांगे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. या वेळी जनसंपर्क अधिकारी शशिकांत जाधव आणि एनसीसी अधिकारी, छात्र उपस्थित होते. या मोहिमेत २५ एनसीसी छात्र व सात विद्यार्थिनी बोटी वल्हवत प्रवास करणार आहेत.

छात्रांना पाण्यातील साहसी व धाडसी वृत्तीला चालना देण्यासाठी ही मोहीम आखली जाते. अखिल भारतीय सागरी नौका भ्रमण मोहीम २०१९-२० च्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन शिबिरातील ही स्पर्धा असते. यात यापूर्वी टू महाराष्ट्र एनसीसी युनिटने घवघवीत यश संपादन केले आहे. मोहिमेत शिडाच्या दोन बोटी २७ फुट लांबीच्या आहेत. १० दिवसांत १० बंदरांना छात्र भेट देणार आहेत. यामध्ये वरवडे, जयगड, बोर्‍या, पालशेत, वेलदूर, दाभोळ, तवसाळ, अंजनवेल, मुरुड, रत्नागिरी यांचा समावेश आहे. हे समुद्री अंतर २२३ नॉटिकल आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सावंतवाडी येथील एनसीसी छात्रांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी मोठी नौका आणि दोन मध्यम यांत्रिक बोटी कार्यरत राहणार आहेत. या प्रवासात छात्रांसह एनसीसी अधिकारी, कमांडर आदी ५४ जण सहभागी होतील.

वारा, समुद्राच्या लाटांशी सामना करत छात्र दर्यावर्दी जीवनाचा अनुभव घेणार आहेत; तसेच बंदरानजीक लोकवस्तीत पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, स्त्री मुक्ती, प्रथमोपचार, पर्यावरणाचा समतोल याबाबत प्रबोधन करणार आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search