Next
दानवेंच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
प्रेस रिलीज
Tuesday, May 15, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या जबरदस्त यशाबद्दल मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कर्नाटकमधील यशाबद्दल खासदार दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा व कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन केले. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, तसेच सध्या चालू असलेल्या पालघर व भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच विजयी होईल,’ असे त्यांनी सांगितले.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, आमदार भाई गिरकर, सरदार तारासिंह, राज पुरोहित, अतुल सावे, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके व अतुल शाह उपस्थित होते.

खासदार दानवे म्हणाले, ‘२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर जम्मू–काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत भाजपला सर्वत्र विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. कर्नाटकमधील विजयामुळे भाजपचे दक्षिणेचे दार उघडले असून, आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे.’

‘भाजपच्या प्रचारासाठी आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नांदेडमधील अनेक कार्यकर्ते कर्नाटकमध्ये गेले होते. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. पालघर व भंडारा– गोंदिया लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीत भाजपच विजयी होईल. पालघरमध्ये काही जणांनी राजकारणाचे नियम मोडले त्यांना जनता बाद करेल. कोणी कितीही कपट कारस्थान केले, तरी भाजपाचा विजय निश्चित आहे,’ असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

आमदार शेलार म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि कर्नाटकतील गरिबांचे नेतृत्व येडियुरप्पा यामुळे त्या राज्यात भाजप विजयी झाला. लिंगायत, वोक्कलिग, मुस्लिम अशा सर्व समुदायांनी भाजपला पाठिंबा दिला. बेळगाव व सीमावर्ती भागात मित्र पक्षाने काँग्रेस व राष्ट्रवादीला साथ दिली, तरीही तेथे भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. भाजप कार्यकर्ता कोणाशीही सामना करायला तयार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search