Next
हिमायतनगर तालुक्यात सीएम चषक स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
नागेश शिंदे
Monday, December 17, 2018 | 12:33 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर :
‘ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि विविध खेळांमध्ये महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने सीएम चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन स्पर्धेचे संयोजक गंगाधर पडवळे यांनी केले. मैदानी खेळ खेळल्याने शरीर सुदृढ व निरोगी बनते, असे सांगून त्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. 



हिमायतनगर शहरात गेल्या आठ दिवसांपासून शहरातील श्री परमेश्वर मंदिर मैदान, हुतात्मा महाविद्यालय आणि नांदेड-किनवट राज्य रस्त्यावरील मैदानामध्ये सीएम चषक स्पर्धा सुरू आहेत. त्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, गायन, १०० मी धावणे, ४०० मीटर धावणे, रांगोळी आदी स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माहूर गडावरील श्री दत्त आश्रम संस्थानाचे योगी श्याम भारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
 


या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष विजय नरवाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे गजानन तुप्तेवार, सुधाकर पाटील, डॉ. प्रसाद डोंगरगावकर, नीलेश डांगे, बाबुराव बोड्डेवार, विठ्ठल पार्डीकर, डॉ. मनोहर राठोड, राजेश जाधव, सोनबा राऊत, सोमवंशी सर, गावंडी सर, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पंदिलवाड, ज्येष्ठ पत्रकार अनिल मादसवार, परमेश्वर शिंदे, गोविंद गोडसेवार, जांबुवंत मिराशे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजक गंगाधर पडवळे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, अजय बेदरकर, सूरज दासेवार आदींसह भाजप युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.



 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link