Next
नक्षलग्रस्त
BOI
Tuesday, May 21, 2019 | 10:18 AM
15 0 0
Share this article:

महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा, जिल्ह्यांत नक्षलवादाने चांगलेच पाय रोवले आहेत. नक्षलवाद म्हणजे नेमके काय, त्याचे मूळ स्वरूप व सध्याची वाटचाल, आदिवासी जनतेवर होणारे अत्याचार याचे दाहक चित्रण प्रतिमा इंगोले यांनी ‘नक्षलग्रस्त’ या कादंबरीतून केले आहे.  

पत्रकार असलेली रागिणी नक्षलवाद जाणून घेण्यासाठी नक्षलग्रस्तांचा प्रभाव असलेल्या गावांमध्ये, जंगलात फिरते. त्या वेळी नक्षलवाद्यांचा खरा चेहरा तिच्यासमोर येतो. सरकार, पोलीस यांच्याकडून आदिवासींवरील अन्यायाविरोधात नक्षलवादी चळवळ उभी राहिली असली, तरी आदिवासींना त्यांचे भय वाटत असे. तेंदूपत्ता गोळा करण्यावरील राजकारणात आदिवासींचा रोजगार हिरावला जातो; पण पोलीस आणि दहशतवादी यांच्याकडून होणारा अन्याय ते बिचारे सहन करत रोजचा दिवस पुढे ढकलत असतात. 

नक्षलवाद्यांच्या दलममध्ये महिलांना समान संधी देत असल्याचा दावा किती फोल आहे हेही रागिणीच्या लक्षात येते. पुरुष नक्षलवाद्यांकडून होणारा बलात्कार, अत्याचार त्यांना सहन करावे लागतात. नक्षलवाद, राजकारण असा दुहेरी वावर असलेल्या नेताजी मडवी याची चित्तरकथाही यात आहे. 
     
पुस्तक : नक्षलग्रस्त 
लेखक : डॉ. प्रतिमा इंगोले
प्रकाशक : सोनल प्रकाशन
पाने : २०८
किंमत : २०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search