Next
तलाठी संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी संतोष आगिवले
BOI
Friday, December 21, 2018 | 11:08 AM
15 0 0
Share this story



भिवंडी : तालुक्यातील पडघेजवळील अर्जुनली तलाठी कार्यालयात कार्यरत असणारे संतोष आगिवले यांची महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची सभा राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ आप्पा डुबल यांच्या अध्यक्षतेखाली भादवड येथील संपदा हॉलमध्ये नुकतीच झाली. या सभेत कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ठाणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी संतोष आगिवले, सरचिटणीसपदी नितीन पिंगळे, कार्याध्यक्षपदी शंकर कांबळे, उपाध्यक्ष भारती शेटे, सुभाष ढोणे, सहसचिवपदी सुरेश सागवेकर, खजिनदार मदन शेलार, संघटक योगेश भोजने, तर सल्लागार म्हणून मंडळ अधिकारी अविनाश तेलगोटे, चंद्रकांत रजपूत आदींची कार्यकारिणी पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

सभेला तलाठी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष अशोक दुधसागरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link