Next
मर्सिडीझ-बेंझची कोल्हापुरात अत्याधुनिक सेवा
प्रेस रिलीज
Friday, July 19, 2019 | 04:01 PM
15 0 0
Share this article:


कोल्हापूर : लक्झरी गाड्यांची भारतातील सर्वांत मोठी उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझने कोल्हापुरात आपल्या अत्याधुनिक सेवेला प्रारंभ केला. हे ट्रिनिटी मोटर्सचे महाराष्ट्रातील तिसरे व मर्सिडीझ-बेंझचे भारतातील ९४वे आउटलेट आहे. अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या शहरात अगदी सोयीस्कर ठिकाणी तब्बल ५२ हजार चौरस फुटांच्या जागेत ही ग्राहकसेवा सुरू करण्यात आली आहे. 

बेंगळूरू महामार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या फॅसिलिटीची रचना ग्राहकांच्या सर्व सेवा गरजा पूर्ण करणारी वन स्टॉप शॉप सुविधा असावी यादृष्टीने करण्यात आली आहे. मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे एमडी व सीईओ मार्टिन श्वेन्क व ट्रिनिटी मोटर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गौरव घाटगे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना श्वेन्क म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे मर्सिडीझ-बेंझ बजावत असलेल्या कामगिरीमुळे दर्जेदार ग्राहक सेवा अशी आमची ओळख निर्माण झाली आहे.  आम्ही असे मानतो की, लक्झरी कार विभागात अत्त्युच्च ग्राहक सेवा हा महत्त्वाचा आणि कंपनीचे वेगळेपण सिद्ध करणारा मुद्दा ठरतो. ६६ सेवा टच पॉइंट्समार्फत कार्यरत असलेल्या मर्सिडीझ-बेंझच्या लक्झरी कार विभागात भारतातील सर्वाधिक सर्व्हिस फॅसिलिटीज आहेत.  ग्राहकसेवेत नावीन्यपूर्ण सेवा, सुविधा, उपक्रम आणत आम्ही याची गुणवत्ता अधिकाधिक वाढवत राहू. या ग्राहकसेवा उपक्रमांमुळे आम्हाला जे. डी. पॉवरकडून कस्टमर सॅटीसफॅक्शन इंडेक्स (सीएसआय) व सेल्स सॅटीसफॅक्शन इंडेक्स (एसएसआय) या दोन्हींमध्ये सर्वांत जास्त रँकिंग मिळाले आहे. आमच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू ग्राहक आहेत.’

‘जागतिक पातळीवरील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेले ऑटोमोटिव्ह हब म्हणून भारताच्या विकासात द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांचे योगदान लक्षणीय आहे. आमच्या एकूण विक्रीपैकी एक तृतीयांश हिस्सा या भागांचा असतो आणि यापुढे त्यामध्ये सातत्याने वाढ होत जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. ‘गो टू कस्टमर’ या आमच्या धोरणाचा हा परिणाम आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सोयीस्कर व्हावे यादृष्टीने त्यांच्या अगदी जवळ सर्व सेवा उपलब्ध करवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो,’ असे त्यांनी सांगितले.

ट्रिनिटी मोटर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर घाटगे म्हणाले, ‘मर्सिडीझ-बेंझ या अतिशय प्रतिष्ठित, मानांकित कंपनीसोबत सहयोग करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. कोल्हापूर व आजूबाजूच्या शहरातील ग्राहकांसाठी अगदी जवळ, सहज पोचता येईल अशा सोयीस्कर ठिकाणी मर्सिडीझ-बेंझ सेवा उपलब्ध करवून देऊन आम्ही ग्राहकांसोबतचे आमचे संबंध अधिक घनिष्ठ करत आहोत.  खर्च करण्याजोग्या उत्पन्नामध्ये होत असलेली वाढ, डॉक्टर्स, लघु व मध्यम उद्योजक, स्टार्टअप उद्यमी यांच्यासारख्या व्यावसायिकांना उत्तम नफा मिळवून देणारे अनुकूल वातावरण असल्यामुळे आज कोल्हापूर हे मर्सिडीझ-बेंझसाठी भारतातील सर्वाधिक आशादायी बाजारपेठांपैकी एक बनले आहे. ही फॅसिलिटी अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे; तसेच येथील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमुळे कोल्हापूर व आजूबाजूच्या भागातील सध्याच्या व संभाव्य ग्राहकांना दर्जेदार व समाधानकारक सेवांचा अनुभव घेता येईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search