Next
कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’
२७ जुलैला पूर्वांचलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, July 26, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आदिवासी जीवनशैली आणि बालमुद्रा या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे हे ६८० भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राइब छत्री’ नावाने फ्रांचायझी आउटलेट सुरू करीत आहेत. 

पुणे महिला मंडळ, पहिला मजला, पर्वती मुख्य चौक (पर्वती पायथा चौक) येथे २७ जुलैला दुपारी चार वाजता   ‘ट्राइब छत्री’चे उद्घाटन पूर्वांचलच्या विद्यार्थिंनींच्या हस्ते होणार आहे. या वेळी केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ट्रायबल को ओपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडियाचे (ट्रायफेड) विभागीय व्यवस्थापक अशोक मिश्रा उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था करण्यात आली असून, केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या मान्यतेचे अशा स्वरूपाचे हे महाराष्ट्रातील पहिले फ्रँचायझी आउटलेट असणार आहे.

कपडे, किचनमधील वस्तू, कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू, शिल्पे, चित्रे, भेट वस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश असणार आहे. देशाच्या विविध राज्यातील आदिवासींकडून या वस्तू मागविण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान, कोरकू, माडिया, गोंड अशा आदिवासी जमातींचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘ट्रायफेड’ आणि ‘ट्राइब्ज इंडिया’च्या मान्यतेने हे केंद्र पुण्यात फ्रँचायझी आउटलेट म्हणून सुरू होत आहे. देशातील  आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरू होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. भावी काळात आदिवासी ज्ञानविषयक हे ‘नॉलेज सेंटर’ म्हणून विकसित करणार असून, ‘ट्रायबल फूड’देखील उपलब्ध करून देणार असल्याचे श्रीकृष्ण परांजपे आणि पूर्वा परांजपे यांनी सांगितले.


पुण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पर्वतीवर रीघ असते, ही गोष्ट लक्षात घेऊन पर्वती पायथा येथील महिला मंडळाच्या जागेत हे केंद्र सुरू करण्यात आले असून, त्याची सजावट आदिवासींमधील वारली, गोंड चित्रकारांनीच केली आहे. या केंद्राच्या सजावटीमध्ये स्मार्ट डिझाइन स्टुडिओचे संतोष महाडिक यांनी मदत केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 51 Days ago
Excellent idea . Hope , it enjoyes commercial success . A documentary , shown all over the country , might help .
0
0
Amit About 81 Days ago
Very nice initiative. Congratulations to paranjape.
0
0

Select Language
Share Link
 
Search