Next
‘जिओ’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर
प्रेस रिलीज
Saturday, January 27 | 05:24 PM
15 0 0
Share this story

मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील ५० कोटी फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी रिलायन्स जिओने देऊ केली आहे. अनलिमिटेड व्हॉईस आणि डेटा अवघ्या ४९ रूपयांमध्ये देऊन डिजिटल स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी रिलायन्स जिओने दिली आहे.

फीचर फोन वापरकर्त्यांना डिजीटल स्वरूपात सक्षम करण्याच हे पाऊल असल्याचे जिओचे म्हणणे आहे. डिजिटल स्वातंत्र्य हे कनेक्टिव्हिटी, परवडणाऱ्या दरातला डेटा आणि हँडसेटच्या माध्यमातून हे शक्य असल्याचे रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे.

रिलायन्स जिओच्या नेटवर्क कव्हरेजच्या सध्याच्या वेगाने यंदाच्या वर्षात ९९ टक्के लोकांपर्यंत ‘जिओ’चे नेटवर्क पोहचेल. सध्याच्या टू-जी कव्हरेजच्या तुलनेत ‘जिओ’चे नेटवर्क हे फोर-जी कनेक्टिव्हिटी अधिक आहे. म्हणूनच उत्तम दर्जाचा आणि परवडणाऱ्या दरातला डेटा मिळवणे सामान्य ग्राहकांना शक्य होणार आहे.

दुसरी बाब म्हणजे परवडणाऱ्या दरातला डेटा. हाय स्पीड डेटा आणि परवडणाऱ्या दरातले जिओ प्लॅन्स यामुळे हे शक्य होणार आहे. फीचर फोनच्या माध्यमातूनही अद्ययावत अशा सेवांमध्ये व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल व्हिडिओ, मोबाईल एप्लिकेशनचा वापर करणे प्रत्येकाला शक्य झाले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने ग्राहकांना एक जीबी या वेगाने मोफत कॉल्स आणि अमर्याद डेटाचा वापर करणे शक्य होणार आहे. या प्लॅनसाठी ४९ रूपये आकारले जातील आणि या प्लॅनचा कालावधी २८ दिवसांचा असेल. त्यासोबत ‘अॅड ऑन पॅक्स’मध्ये ११, २१, ५१, १०१ रुपयांचे अतिरिक्त पॅकही ‘जिओ’ने जाहीर केले आहेत.

तिसरी बाब म्हणजे परवडणाऱ्या दरातला हँडसेट. बाजारात अनेक एंट्री लेव्हलचे स्मार्टफोन तीन हजार ते चार हजार ५०० रुपये या दरम्यान आहेत. त्यामुळेच फीचर फोन वापरकर्त्यांना त्याचे रूपांतर स्मार्टफोनमध्ये करणे अवघड आहे. म्हणूनच ‘फ्री जिओफोन’च्या योजनेची घोषणा ‘जिओ’ करत आहे. जिओफोन हे केवळ एक नाविन्यपूर्ण उत्पादन नाही, तर एक नव्या चळवळीची सुरुवात आहे.

‘जिओफोन ही ऑफर वैध असेपर्यंत या मोहिमेचा भाग व्हा’, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिओफोन खरेदीसाठी : Myjio App आणि jio.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link