Next
‘मधुमती’च्या आठवणी जागवणारा कार्यक्रम
BOI
Monday, October 01, 2018 | 06:30 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘रसिकांच्या मनावर साठ वर्षांनंतरही अधिराज्य गाजवणाऱ्या ‘मधुमती’ या चित्रपटाच्या आठवणी जगवण्याचा कार्यक्रम येत्या चार ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे’,अशी माहिती सत्येंद्र राठी यांनी दिली. 

‘संवेदनशील दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या या अप्रतिम कलाकृतीच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन साठ वर्षे झाली.  त्याच्या आठवणींना उजाळा देणारा ‘मधुमतीची साठ वर्षे’ हा कार्यक्रम ‘के अँड क्यू परिवार’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सलील चौधरींना संगीतकार म्हणून घ्यायला दिलीपकुमारने विरोध का केला?, सरोज खान मधुमतीत काय करत होत्या?, बिमलदा यांना मधुमती का बनवावा लागला ? या चित्रपटाला मिळालेल्या नऊ फिल्म फेअर पुरस्कारांचा विक्रम मोडायला किती वर्षे जावी लागली? या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमात मिळणार आहेत. या वेळी बिमल रॉय यांच्या कन्या रिंकी रॉय भट्टाचार्य यांच्याशी सिने अभ्यासक अंजुम रजबअली संवाद साधणार आहेत’, असेही राठी यांनी सांगितले. 

‘ग्रामीण पार्श्वभूमीवर हा चित्रपट घेतलेला असल्याने, बीड येथे वनवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या ठमाबाई पवार यांना ‘मधुमती’पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे’, असेही राठी यांनी नमूद केले. 

कार्यक्रमाविषयी 
‘मधुमतीची साठ वर्षे’
स्थळ : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय.
वेळ : गुरुवार, ४ ऑक्टोबर, संध्याकाळी ५ वाजता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search