Next
पीएमसी बँकेतून काढता येणार १० हजार रुपये!
रिझर्व्ह बँकेचा खातेदारांना दिलासा
BOI
Thursday, September 26, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

 मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून (पीएमसी) खातेदारांना आता दहा हजार रुपये काढता येणार आहेत. यापूर्वी केवळ एक हजार रुपयेच बँकेतून काढता येत होते.  रिझर्व्ह बँकेने आज जारी केलेल्या अध्यादेशानुसार, ही मर्यादा वाढवण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या सवलतीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने या बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. 

रिझर्व्ह बँकेच्या अध्यादेशानुसार, बचत आणि चालू बचत (करंट) खात्यातून बँकेच्या खातेदारांना दहा हजार रुपये काढता येतील. यापूर्वी कोणी एक हजार रुपये काढले असतील तरीही त्या खातेदाराला नव्या मर्यादेप्रमाणे दहा हजार रुपये काढता येतील. या आदेशामुळे बँकेचे ६० टक्के खातेधारक आपले पूर्ण पैसे काढू शकतील, असा अंदाज आहे.

दरम्यान, पीएमसी बँकेच्या अनेक खातेधारांनी आज पोलिसांत सामुहिक तक्रार दाखल केली. रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले असून, बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search