Next
‘आरटीई’च्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
प्रेस रिलीज
Saturday, February 23, 2019 | 03:19 PM
15 0 0
Share this story

नागपूर : ‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९च्या कलम १२(१)सी नुसार वं‍चित व दुर्बल घटकातील बालकांसाठी राखीव प्रवेशांतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी शैक्षणिक सत्र २०१९-२०साठी यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे, ‘‘आरटीई’ प्रवेशपात्र शाळांचे आणि नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून चार मार्चपर्यंत तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी आठ फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज ५ ते २२ मार्चदरम्यान सादर करावेत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीची पालकांनी नोंद घ्यावी.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link