मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व नाशिक शिक्षक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय ए) पक्षाचा पाठिंबा असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी १९ जून रोजी मुंबईत जाहीर केले.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार, प्रदेश सचिव संजय उपाध्याय, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते मधु चव्हाण व अतुल शाह उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, ‘मुंबई पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार ॲड. अमित मेहता, कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अनिल देशमुख व नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार अनिकेत पाटील यांना ‘आरपीआय’चा पाठिंबा असून, या उमेदवारांच्या विजयासाठी ‘आरपीआय’चे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी काम करतील.