Next
‘योग दिन सर्व तालुक्यांमध्ये साजरा होणार’
शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची माहिती
प्रेस रिलीज
Thursday, June 13, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना विनोद तावडेमुंबई : ‘गेल्या चार वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील सर्व २८८ तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलामध्ये साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज (१३ जून २०१९) पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांतील २८८ तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यांतील शाळा, महाविद्यालये, एनएसएस, एनसीसी, स्काउट-गाइड असे किमान पाच हजार विद्यार्थी असे मिळून सुमारे १५ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयामार्फत देण्यात आलेला योगeबाबतचा प्रोटोकॉल या वेळी विद्यार्थी करणार आहेत. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे. या शिवाय २१ जूनला नांदेड येथे रामदेवबाबांतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दीड लाख नागरिक सहभागी होणार आहेत.’

मुंबई, कोकण, पुणे अशा ठिकाणी पावसाची शक्यता आहे तेथे पाऊस पडल्यास विद्यार्थ्यांना योग कुठे करता येईल, याबाबतही तयारी करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयामार्फत योगासाठी सकाळी सात ते आठ ही वेळ देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिल्याचे तावडे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search