Next
आदर्श उद्योजक पुरस्कारांचे रविवारी वितरण
BOI
Thursday, June 20, 2019 | 01:20 PM
15 0 0
Share this article:



पुणे :
मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत असलेल्या मराठी आंत्रेप्रिन्युअर नेटवर्क फोरमच्या (एमईएन) चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श उद्योजक-उद्योजिकांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
  
'हा कार्यक्रम २३ जून रोजी घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी पाच वाजता होईल,' अशी माहिती फोरमचे शिरीष देशपांडे यांनी दिली. या वेळी सुरेंद्र कुलकर्णी, राजेश जोशी, नंदकुमार तळेकर, वृषभनाथ कोंडेकर आदी उपस्थित होते.

'मराठी आंत्रेप्रिन्युअर नेटवर्क फोरम हे मराठी उद्योजकांनी मराठी उद्योजकांसाठी तयार केलेले व्यासपीठ आहे. विविध व्यवसायातील  लोकांशी देवाणघेवाण करून व्यवसायाची व्याप्ती वाढविणे या विचारांतून फोरम काम करत आहे,' असेही देशपांडे यांनी सांगितले. 

'मराठी व्यावसायिकांना आपला उद्योग वाढवावा, यासाठी फोरमच्या वतीने २३, २४ व २५ ऑगस्ट या कालावधीत एका प्रदर्शनाचेही आयोजन केले आहे. अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,'असे आवाहन राजेश जोशी यांनी केले आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search