Next
एक्झिक्युटिव्ह पीजीडीएमसाठी प्रवेशाला सुरुवात
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 12:31 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारतातील आघाडीचे बी-स्कूल आयएमआय नवी दिल्लीने एक्झिक्युटिव्ह पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. हा अभ्यासक्रम अशा अनुभवी मध्यमस्तराच्या व्यवस्थापकांसाठी तयार केला. या अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०१८ असून, याचे वर्ग एप्रिल २०१९च्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील.

एक्झिक्युटिव्ह पीजीडीएम हा १५ महिन्यांचा पूर्ण-वेळ अभ्यासक्रम आहे, ज्यात विद्यार्थ्यांना सामान्य व्यवस्थापन आणि फंक्शनल एरिया ऑपरेशनसाठी तयार करण्यात येते. या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय मॉड्यूलसह किंवा आंतरराष्ट्रीय मॉड्यूलशिवाय असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी सर्व सहभागींकडे पदवी (किमान तीन वर्षांचे महाविद्यालयीन शिक्षण) किंवा त्यास समकक्ष, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हार्सिटीजद्वारा मान्य अशी पदवी असली पाहिजे व त्यात कमीत कमी (अॅग्रिगेट) ५० टक्के गुण प्राप्त केलेले असले पाहिजेत.

आंतरराष्ट्रीय मॉड्यूलसह एक्झिक्युटिव्ह पीजीडीएम हा १२ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे व त्यामध्ये प्रत्येकी ११ ते १२ आठवड्यांच्या चार तिमाही आहेत; तसेच अभ्यासक्रमाच्या अखेरीस तीन महिन्यांचा फील्ड रिसर्च प्रोजेक्ट आहे. या १२ पैकी पाच आठवड्यांचा पाठ्यक्रम आयएमआयच्या युरोपातील भागीदार बिझनेस स्कूलमध्ये घेतला जाईल आणि बाकीचे वर्ग आयएमआयच्या दिल्लीतील कॅंपसमध्ये घेतले जातील.

आंतरराष्ट्रीय मॉड्यूलशिवाय एक्झिक्युटिव्ह पीजीडीएम या पर्यायातदेखील १२ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे आणि त्यामध्ये प्रत्येकी ११ ते १२ आठवड्यांच्या चार तिमाही आहेत, तसेच अभ्यासक्रमाच्या अखेरीस तीन महिन्यांचा फील्ड रिसर्च प्रोजेक्ट आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम आयएमआयच्या दिल्लीतील कॅंपसमध्ये चालवण्यात येईल.

आयएमआय नवी दिल्लीच्या प्रोग्राम चेअर एक्झिक्युटिव्ह सोनू गोयल म्हणाल्या, ‘एक्झिक्युटिव्ह पीजीडीएमअंतर्गत आम्ही आकर्षक मॉड्यूल, फील्ड रिसर्च प्रोजेक्ट आणि अनेक विविध अभ्यासक्रम यांचे मिश्रण केलेले आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण औद्योगिक पार्श्वभूमीतून आलेले सहध्यायींचे एक निरोगी वातावरण असते, ज्यामुळे बाजारपेठेबाबत एक व्यापक आकलन तयार होते; तसेच अनेकांगी दृष्टिकोन तयार होतो. या अभ्यासक्रमामुळे काम करणाऱ्या एक्झिक्युटिव्ह्जना आपल्या करियरमध्ये थोडा विराम घेऊन आपली कौशल्ये सुधारण्याची आणि अत्यंत प्रतिस्पर्धात्मक अशा व्यावसायिक वातावरणात उत्तम कामगिरीसाठी तयारी करण्याची संधी मिळते. हा अभ्यासक्रम आपल्या कारकिर्दीच्या मार्गाबाबत पुन्हा विचार करण्याची आणि त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्याची संधी देतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search