Next
पालक सूप
BOI
Wednesday, February 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

पालक सूप

आजकाल हॉटेल्समध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जेवणासाठी गेल्यानंतर स्टार्टर म्हणून मग मसाला पापड आणि एखादं सूप घेतलं जातं. परंतु यामध्ये पालक सूप घेताना फार कोणी दिसत नाही. विशेषतः आजकाल तयार सूपची पॅकेट्स बाजारात मिळतात, त्यामुळे घरीही सूप अगदी झटपट बनवता येते. या सगळ्यांत पालक सूप हेदेखील असेच झटपट बनवता येणारे सूप आहे. विशेषतः ते आरोग्याच्या दृष्टीने उत्तमही आहे. डोळ्यांसाठी चांगले, आयर्नयुक्त आणि थंडीत उपयुक्त असे पौष्टिक ‘पालक सूप’ स्टार्टर म्हणूनही निश्चितच एक उत्तम पर्याय ठरू शकते. 'खवय्येगिरी' सदरात आज पाहू या पालक सूप...

साहित्य : 
बारीक चिरलेला पालक – तीन वाट्या, कांदा – एक मोठा, मुगाची डाळ – अर्धी वाटी, दूध – दोन कप, चवीनुसार मीठ आणि मिरपूड


कृती :
- सर्वप्रथम कांदा बारीक चिरावा. 
- डाळ व पालक स्वच्छ धुवून घ्यावेत. 
- हे तीनही घटक एकत्र करून दोन कप पाणी घालून शिजवावेत. 
- त्यानंतर ते चांगले वाटून घ्यावेत. 
- त्यात दूध घालून ते घुसळून घ्यावेत.
- बारीक गाळणीने ते गाळून घ्यावे.
- त्यात चवीनुसार मीठ व मिरपूड घालावी.
- हे सूप सर्व्ह करताना त्यात पनीरचा चुरा, ब्रेडचे तळलेले छोटे तुकडे किंवा अर्धा चमचा गाजराचा कीस घालून सजवावे व गरमगरम पिण्यास द्यावे.

(या सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/B8eZZh या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link