Next
‘रेल्वे भरती प्रक्रिया पारदर्शी’
प्रेस रिलीज
Thursday, March 22 | 06:08 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : ‘भारतीय रेल्वेत सध्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू आहे. ही भरती करताना सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेले नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी रेल्वे मंत्रालय सुयोग्य, पारदर्शी आणि स्पर्धात्मक भरती प्रक्रिया धोरण राबवत आहे,’ अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली.

रेल्वेच्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ‘कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ॲप्रेन्टीस’साठी नोकरभरतीत २० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी कायद्याच्या कलम २२ (एक) अंतर्गत आणि या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालांच्या आधारावर हा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांच्यासाठी नोकरभरतीत वयोमर्यादा (प्रशिक्षणाच्या कालावधीच्या प्रमाणात) शिथिल करण्यात आली आहे.

पियुष गोयल‘ही देशातल्या आजवरच्या कोणत्याही संस्थेकडून झालेल्या भरतीपेक्षा सर्वाधिक मोठी भरतीप्रक्रिया आहे. सर्व स्तरातले युवक आणि प्रशिक्षणार्थींसाठी ही एक अपूर्व संधी आहे. अत्यंत पारदर्शक आणि न्याय पद्धतीने ही भरती होत आहे. या नोकरभरतीसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे. या नोकरीची समान संधी मिळवण्यासाठी सर्वांनी या भरती प्रकियेत सहभागी व्हावे,’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link