Next
‘आझम कँपस’तर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, December 04 | 04:40 PM
15 0 0
Share this story

पुणे : आझम कँपसतर्फे ‘धर्म आणि नैतिक मूल्ये’ या विषयावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात होणार आहे.

हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि धर्मातील नैतिक मूल्यांचा प्रसार’, ‘इस्लाम धर्मातील कष्टाचे महत्त्व’, ‘विविध धर्मांतील नैतिक मूल्ये’ असे विषय देण्यात आले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांत ही स्पर्धा घेतली जाणार असून, यासाठी आठवी ते दहावी, अकरावी ते डीएड आणि पदवी-व्यावसायिक अभ्यासक्रम असे तीन गट करण्यात आले आहेत.

‘प्रत्येक गटातील प्रत्येक विषयाच्या प्रथम तीन क्रमाकांस अनुक्रमे १० हजार, आठ हजार आणि पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्व धर्मीय स्पर्धकांना सहभागी होता येणार असून, त्यासाठी १० डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करायची आहे,’ अशी माहिती हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष झुबेर शेख यांनी सांगितले.

नाव नोंदणीसाठी संपर्क : (०२०) २६४५ २२८८
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link