Next
वाळुशिल्पातून दिला बालमजुरी थांबवण्याचा संदेश
BOI
Wednesday, June 12, 2019 | 11:39 AM
15 0 0
Share this article:


पुरी : ‘बालमजुरी थांबवा’ असा संदेश देणारे वाळूचे शिल्प ओडिशातील प्रसिद्ध वाळुशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर साकारले आहे. १२ जून हा जागतिक बालकामगारविरोधी दिन (वर्ल्ड डे अगेन्स्ट चाइल्ड लेबर) म्हणून २००२पासून जगभर पाळला जातो. त्या निमित्ताने पटनाईक यांनी हे वाळुशिल्प साकारले आहे.

वेगवेगळ्या विषयांवर संदेश देणारी वाळुशिल्पे साकारणारे कलाकार म्हणून सुदर्शन पटनाईक यांची ओळख आहे. ‘बालमजुरी थांबवा’ असा संदेश त्यांनी या नव्या शिल्पातून दिला आहे. बालमजुरी नष्ट करण्याकरिता जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. सरकार, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र येऊन बालमजुरी थांबवण्यासाठी प्रयत्न करतात. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून पटनाईक यांनी हे शिल्प साकारले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search