Next
‘सरीवर सरी’तील गीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद
प्रेस रिलीज
Monday, June 18 | 05:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : रविवारची निवांत संध्याकाळ, दाटून आलेले आभाळ, हलक्या सरींचा नाजूक वर्षाव, अशा वातावरणात कात्रजमध्ये सादर झालेल्या ‘सरीवर सरी’ या गीतांच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. निमित्त होते ते पूजा निवास सहकारी गृहनिर्माण संस्था आणि गंगोत्री ग्रीनबिल्ड यांच्यातर्फे आयोजित स्नेहमेळाव्याचे.

कात्रज सर्पोउद्यानासमोरील पूजा निवास येथे हा कार्यक्रम झाला. चैतन्य कुलकर्णी, मानसी परांजपे या गायकांनी एकामागून एक बहारदार पाऊसगाणी, तसेच मराठी-हिंदी चित्रपटातील गीते सादर केली. अभिजित कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या वेळी सादर करण्यात आलेल्या ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मनाच्या धुंदीत’, ‘ही गुलाबी हवा’, ‘सूर निरागस हो’, ‘गोमू संगतीन’, ‘मेरा नाम चिंचिंचू’, तसेच किशोर कुमार यांच्या गाण्यांच्या शृंखलेतील गीतांना रसिकांची दाद मिळाली.

या वेळी नगरसेविका स्मिता कोंढरे, नगरसेवक युवराज बेलदरे, गंगोत्री ग्रीनबिल्डचे संचालक गणेश जाधव, मकरंद केळकर, राजेंद्र आवटे, पूजा निवास सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किशोर गंभीर, सचिव प्रवीण पवार, खजिनदार समीर निरवणे उपस्थित होते. गणेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link