Next
‘स्पर्धा परीक्षांकडे आत्मविश्वासाने पाहावे’
रत्नागिरीचे नायब तहसीलदार बाळासाहेब दराडे यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, July 23, 2019 | 03:53 PM
15 0 0
Share this article:

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार बाळासाहेब दराडे

रत्नागिरी : ‘विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वासाने पाहिले पाहिजे. कठोर कष्ट नव्हे, तर सुनियोजित योग्य अभ्यासाची आवश्यकता आहे. टॉपर्सना फॉलो करू नका कारण प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा क्षमता वेगवेगळी असते. सकारात्मक विचार करत राहिल्यास या परीक्षेत यश मिळवणे कठीण नाही. अपयश आल्यास खचून न जाता पुन्हा उभे राहता आले पाहिजे. स्वतःच स्वतःशी स्पर्धा करून आपल्या कौशल्यांचा विकास केला पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे नायब तहसीलदार बाळासाहेब दराडे यांनी केले.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे २० जुलैला मोफत कार्यशाळेचे आयोजन काण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी अकादमीच्या समन्वयक इंदुमती मलुष्टे, प्रशांत जगताप, शंतनु दुधाडे आदी उपस्थित होते.

नायब तहसीलदारांचे स्वागत करताना अकादमीच्या समन्वयक इंदुमती मलुष्टे. शेजारी प्रशांत जगताप, शंतनु दुधाडे.

दराडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आर्थिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक अडचणींवर मात करून सर्वोत्तम गुण ओळखून तयारी केली पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये ट्रायल व एरर अशा प्रकारे अभ्यास करून चालत नाही. या प्रकारे अभ्यास केला, तर केवळ ज्ञान व अनुभव मिळतो; पण यश मिळत नाही. त्यामुळे यश मिळवण्यासाठी नियोजनात्मक अभ्यास केला पाहिजे. प्रश्‍नपत्रिकेचा ट्रेंड काय आहे, हे समजून घ्या. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे ठरवा. अनेक जण आठ-दहा तास अभ्यास करत बसतात; पण नेमके काय लिहायचे आहे ते कळत नसल्याने पूर्वपरीक्षेला उत्तीर्ण होऊ शकत नाहीत. टॉपर्स विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. वेबसाइट्स, पुस्तके उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घ्या. भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपणच आपला दीप झाले पाहिजे.’ 

‘अकादमीतर्फे २२ जुलैपासून एमपीएससी बॅच व एक ऑगस्टपासून फाउंडेशन बॅच चालू होत असून, यात एमपीएससीद्वारे उत्तीर्ण झालेले आठ शिक्षक विद्यार्थ्यांना नियमित शिकवणार आहेत. क्लासरूम, मासिक, चालू घडामोडींच्या विशेष टेस्ट, व्यक्तिमत्त्व विकासासाठी सामाजिक उपक्रम, ग्रंथालय, अभ्यासिका, इंटरनेटची सोय या सर्व सोयीसुविधा कोर्सच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध असणार आहेत. २४ जुलैपासून बँकिंग इन्शुरन्स व रेल्वेसाठी कोर्स सुरू होत आहे,’ अशी माहिती अकादमीच्या समन्वयक मलुष्टे यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search