Next
‘ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे अपघातांचे प्रमाण घटेल’
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 12:30 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. इतर क्षेत्राप्रमाणे ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर वाहतूक व्यवस्थापनात केला, तर अपघातांचे प्रमाण घटेल. शिवाय वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता येईल आणि वाहतूक कोंडी सुटेल,’ असे मत ‘कोमाऊ इंडिया’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक सुरेंद्र ओतूरकर यांनी व्यक्त केले.

वाघोली येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कौशल्य विकास उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी ‘इंडस्ट्रीयल ऑटोमेशन’वर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली होती. कोमाऊ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे तंत्र व्यवस्थापक ओतूरकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या प्रसंगी रायसोनी शिक्षण समूहाचे विश्वस्त संचालक अजित टाटीया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर व प्रभारी संचालक डॉ. वैभव हेंद्रे, रिसर्च पर्सन सचिन कदम उपस्थित होते.

ओतुरकर म्हणाले, ‘ऑटोमेशनमुळे अवजड कामे करणे सोईचे होते. त्यामुळे मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च याची बचत होते. शहरे स्मार्ट होताहेत. लोकांचे आयुष्य सुकर होत आहे. त्यामुळे ऑटोमेशन तंत्रज्ञानाची व्याप्ती आपण समजून घेतली पाहिजे.’

डॉ. हेंद्रे म्हणाले, ‘रस्त्यावरील दिव्यांचे ऑटोमेशन करता येणे शक्य आहे. हे दिवे फक्त अंधार असेल तोपर्यंत सुरू राहतील व सूर्यप्रकाश असेल तेव्हा आपोआप बंद होतील. त्यामुळे विजेची फार मोठी बचत होईल. शासनाच्या विविध जनकल्याणाच्या स्कीम आहेत. त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या प्रा. मिता बकुळी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link