Next
शिवशाहीर पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
जिल्हाधिकाऱ्यांनी घरी जाऊन पुरस्कार प्रदान केला
BOI
Wednesday, May 08, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान केला.

पुणे : शिवशाहीर बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार त्यांच्या निवासस्थानी आदरपूर्वक प्रदान करण्या‍त आला. 

पुरंदरे यांना भारत सरकारने वर्ष २०१९ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला होता. ११ मार्च २०१९ रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यास वैयक्तिक कारणास्तव बाबासाहेब पुरंदरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राम यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पद्मविभूषण पुरस्कार (पद्म विभूषण पदक, मिनिएचर व प्रमाणपत्र) आदरपूर्वक प्रदान केला. या वेळी तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search