Next
मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नि:शुल्क कॉक्लिअर इम्प्लांट शिबिर
प्रेस रिलीज
Wednesday, May 23 | 05:14 PM
15 0 0
Share this story

कॉक्लिअर इम्प्लांट यशस्वी झालेल्या दोन छोट्या रूग्णांसह दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. विक्रम ओक, डॉ. नीलांजन भौमिक, ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार, हॅबिलीटेशनिस्ट वृषाली देसाई, गोविंद राजोपाध्ये आणि कोऑर्डीनेटर रेवा इंदुरकर आदी

पुणे : लहान मुलांना कर्णबधीरपणावर मात करून नवीन आयुष्य जगायची संधी देणाऱ्या अत्याधुनिक कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचा लाभ जास्तीत जास्त मुलांना घेता यावा, यासाठी येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलतर्फे  चार जून ते नऊ जून दरम्यान नि:शुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात  सर्जरी, ऑडियोलॉजी आणि हॅबिलीटेशनमधील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असून, लवकर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्याने मुलांच्या बोलण्यावर, अभ्यासावर कसा फायदा होतो, कुठले कॉक्लिअर इम्प्लांट निवडावे, सर्वात प्रगत कॉक्लिअर इम्प्लांट कोणते आहे, याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 

दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या तीन मुलांवर यशस्वीरीत्या कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून, त्यांना त्यांचे बालपण परत मिळवून देण्यात येथील डॉक्टरांना यश आले आहे. गेल्या वर्षापासून येथे कॉक्लिअर इम्प्लांट उपक्रम सुरु आहे. या आधुनिक उपचार पद्धतीचा प्रसार करून, गरजूंपर्यंत याचा लाभ मिळावा याकरता डॉ. शब्बीर इंदोरवाला, डॉ. विक्रम ओक, डॉ. नीलांजन भौमिक, ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार, हॅबिलीटेशनिस्ट वृषाली देसाई, गोविंद राजोपाध्ये आणि कॉकलीयर इम्प्लांट कोऑर्डीनेटर रेवा इंदुरकर आदी तज्ञ मंडळी प्रयत्नशील आहेत. 
  
जगातील जवळजवळ ३६ कोटी लोक म्हणजे लोकसंख्येच्या पाच टक्के लोक ऐकू न येण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यापैकी नऊ टक्के म्हणजे तीन कोटी दोन लाख, १५ वर्षांखालील मुले आहेत. दर हजारामधील पाच मुले अत्यंत कमी वयातच या समस्येला बळी पडतात. ऐकू न येण्यामुळे बालक बोलुदेखील शकत नाही. या सगळ्याचा वाईट परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो.यावर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया प्रभावी उपाय ठरली आहे. 

‘भारतात न्यू बॉर्न स्क्रीनिंगची अत्यंत आवश्यकता असून, त्यामुळे बालकांच्या जन्माच्या वेळीच ऐकण्याचे निदान केले जाईल. कॉक्लिअर इम्प्लांटच्या मदतीने बहिरेपणा समूळ नष्ट होऊन एक नवीन आयुष्य प्राप्त होते’, असे मत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन्स डॉ. विक्रम ओक आणि डॉ. नीलांजन भौमिक यांनी व्यक्त केले. 
 
‘अल्पवयात बहिरेपणाचे निदान झाल्याने कॉक्लिअर इम्प्लांटसच्या माध्यमातून ते लगेच बरे करण्यात येते. ह्यामुळे मुलांची भाषा चांगली होण्यास मदत होते व एक सामान्य माणूस म्हणून ते आयुष्य जगू शकतात’, असे मत ऑडीयोलॉजीस्ट नितीश कुमार यांनी मांडले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Hemant wani About 232 Days ago
Nice
0
0
Rahul more About 233 Days ago
या बद्दल जनजागृती करण्याची खरच गरज आहे उदाहरण म्हणजे प्लांट कोणता निवडावा वैगेरे तुम्हि या शिबिरातून एक छान उपक्रम सुरू केला आहे तुमचे अभिनंदन राहुल मोरे
0
0
Dnyaneshwar Ganpat Londhe About 233 Days ago
My son is los hearing and not spich, Your 2.5 iyars old
0
0
DR SANJAY SONAWALE About 233 Days ago
Great congratulations Dr Vikram Oak a dynamic sincere SURGEON my best wishes for this abhiyan
1
0
BAHADARE About 233 Days ago
हार्दिक अभिनंदन माझ्या मुलीच पण कराल का काॅकलीअर ईमप्लाट ती तीन वर्षांची आहे
1
0
sachin mane About 233 Days ago
changla upkram aahe
1
0

Select Language
Share Link