Next
हास्ययोग​ कार्यकर्त्यांनी लुटला ​कार्यक्रमाचा आनंद
प्रेस रिलीज
Wednesday, December 20 | 04:38 PM
15 0 0
Share this story

पुणे : ​​​अनेक गाजलेल्या सुरेल हिंदी गीतांची बरसात, सर्व ज्येष्ठ हास्ययोग कार्यकर्त्यांनी केलेले उत्स्फूर्त नृत्य यामुळे ​‘आज फिर जीने कि तमन्ना है’ ​हा गीतांचा कार्यक्रम गाजला. निमित्त होते ​​​नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या द्वीदशकपूर्ती​ कार्यक्रमाचे.

​​यानिमित्त ​मंगळवारी (ता. १९) मनीषा लताड, गंधार एंटरटेनमेंट्स आणि महक प्रस्तुत​ ‘आज फिर जीने कि तमन्ना है’​ हा कार्यक्रम ​गणेश कला क्रीडा मंच येथे ​आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा हास्ययोग​ कार्यकर्त्यांनी ​आनंद लुटला. ‘नवचैतन्य’​च्या उपाध्यक्ष सुमन काटे यांनी मनीषा लताड यांचा सत्कार केला. या वेळी ‘नवचैतन्य’चे अध्यक्ष विठ्ठल काटे यांसह मान्यवर उपस्थित होते. ​​

मनीषा लताड​, ​गफार मोमीन, विवेक पांडे​ या गायक ​कलाकारांनी सादर केलेल्या गीतांवर रसिकांनी ठेका धरला. यामध्ये ‘आज फिर जिने कि तमन्ना है’, ‘​​सत्यम शिवम सुंदरम’, ‘परदा है परदा’ आदी गाण्यांचा समावेश होता. ​आबालवृद्धांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला.

गाण्याच्या तालात आपले वय विसरून धुंद होऊन नृत्य देखील केले. ​टाळ्यांच्या आणि शिट्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी दाद दिल्याने सभागृहातील वातावरण नादमय झाले होते. ​त्यामुळे हा गाण्याचा कार्यक्रम ​ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरला ​आणि ​हास्ययोगाच्या द्वीदशकपूर्तीला मनोरंजनाची सुरेल साथ ​मिळाली. ​​​ ​

कार्यक्रमाची संकल्पना ​निश्चल लताड यांची होती. संगीत संयोजन सईद बाबा खान यांचे ​होते, तर ​संदीप पंचवाडकर ​यांनी कार्यक्रमाचे निवेदन ​केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link