Next
विद्यार्थ्यांनी बनवले अंध लोकांसाठी भोजन
आंतरराष्ट्रीय शेफ दिनानिमित्त ‘कोहिनूर’चा विशेष उपक्रम
BOI
Tuesday, October 23 | 12:09 PM
15 0 0
Share this story


खंडाळा : येथील कोहिनूर आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्यावतीने आंतरराष्ट्रीय शेफ दिनाचे औचित्य साधून अंध आणि वृद्ध लोकांना भोजन देण्यात आले. दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय शेफ दिन साजरा केला जातो. यानिमित्त रविवारी, दि. २० ऑक्टोबर रोजी संस्थेत नॅब लायन्स होममधील अंध लोकांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भोजन बनवून या ज्येष्ठ लोकांना वाढले. 

ज्यांना गरज होती त्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवलेदेखील. या लोकांचे मनोरंजन करण्यासाठी विद्यार्थ्यानी गाणी म्हटली. काही खेळही खेळण्यात आले. अत्यंत आनंदी, उत्साहपूर्ण वातावरणात हा भोजनसोहळा पार पडला. या ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. 

मुलांना शेफ म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासह, आरोग्यदायी अन्नपदार्थ खाल्ले, तर आरोग्य चांगले राहू शकते असा संदेश या वेळी देण्यात आला. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, आपल्याकडे असलेल्या कौशल्यांच्या आधारे आपण हे काम करू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमामुळे खूप समाधान आणि आनंद वाटल्याची भावना व्यक्त केली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link