Next
एफबीबीतर्फे १७ जूनपर्यंत ‘फॅशन बोनांझा’
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 04:45 PM
15 0 0
Share this story

पुणे :  फ्युचर समूहाचा भारतातील फॅशन ब्रॅंड ‘एफबीबी’ने एक ते १७ जून, या काळात ‘फॅशन बोनांझा’ जाहीर केला आहे. या काळात ग्राहकांना, दोन हजार ५०० रुपयांची खरेदी केल्यास एक हजार रुपये परत मिळतील. महिला, पुरुष आणि लहान मुलांचे पारंपरिक कपडे, फॉर्मल्स आणि कॅज्युअल वेअर्सच्या खरेदीवर ही सवलत लागू आहे.  

या सवलत योजनेबद्दल एफबीबीचे सीओओ राजेश सेठ म्हणाले, ‘ग्राहकांनी दोन हजार पाचशे रुपयांची खरेदी केल्यास, प्रत्येकी २५० रुपयांचे एक अशी एक हजार रुपये मूल्याची व्हाउचर्स मिळतील. ही व्हाउचर्स त्यांना जून,जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०१८ या चार महिन्यांत वापरावी लागतील.’

ते पुढे म्हणाले, ‘सणासुदीचे दिवस म्हणजे कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत उत्सवाचे, एकत्र येण्याचे. या काळात प्रत्येकाला खूप छान दिसायचे असते. हे त्यांच्या खिशालाही परवडावे याची काळजी ‘एफबीबी फॅशन बोनांझा’ने घेतली आहे. महिलांसाठी,मुलींसाठी सृष्टी, नवरस आणि अतीशासारख्या लोकप्रिय ब्रॅंडचे कुर्ते, अनारकली सुट्स, स्कर्ट्स, ‘डीजे अँड सी’या अग्रगण्य ब्रॅंडचे ड्रेसेस, ऑफ-शोल्डर टॉप्स, फ्लोरल स्कर्ट्स, श्रग्ज आदींचे  ‘ब्लेंड इट लाइक कॅट’ कलेक्शन सज्ज आहे, तर पुरुषांसाठी  ‘एफबीबी ब्रॅंड अँबेसेडर आणि यूथ आयकॉन वरुण धवन शिफारस करत असलेल्या ‘बफेलो’ या अग्रगण्य ब्रॅंडचे  फॅशनेबल शर्ट्स, ट्राउझर्स, टी-शर्ट्स, शॉर्ट्स आदींचा समावेश कलेक्शन उपलब्ध आहे. ज्यांना पारंपरिक लूक हवा आहे त्यांच्यासाठी ‘शतरंज’चे कुर्ते आहेत. लहान मुलांसाठीही कॅज्युअल, एथ्निक आणि पार्टीवेअरचे बरेच वैविध्य आहे. त्यामुळे सर्वांसाठी मनसोक्त कपडे खरेदीची ही संधी देताना आम्हाला आनंद होत आहे.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link