Next
क्रीडा क्षेत्रातील ताऱ्यांचा सन्मान
BOI
Wednesday, September 26, 2018 | 01:15 PM
15 0 0
Share this article:

पुरस्कार समारंभात उपस्थित पुरस्कार विजेते सर्व खेळाडू

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना गौरवण्यासाठी दर वर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. २०१८च्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारविजेत्या खेळाडूंना २५ सप्टेंबर २०१८ रोजी नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारविजेत्यांचा घेतलेला हा धावता आढावा...
..........
२०१८चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आणि मौलाना अबुल कलाम आझाद करंडक या पुरस्कारांचा क्रीडा पुरस्कारांमध्ये समावेश आहे. 

साडेसात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप आहे. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाते. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाते. आंतरविद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषक, १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाते. 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : 
१. साईकोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) : जन्म आठ ऑगस्ट १९९४. २०१४पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर ४८ किलो श्रेणीत सातत्याने सहभाग. विश्व चॅम्पियन स्पर्धा, तसेच राष्ट्रकुल खेळांमध्ये पदके. पद्मश्री पुरस्कारप्राप्त. २०१७मध्ये अमेरिकेत झालेल्या विश्व भारत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक. २३ वर्षांनंतर भारत्तोलन खेळाडूला हा पुरस्कार. याआधी कर्नम मल्लेश्वरी (१९९४-९५) आणि कुंजुरानी देवी (१९९६-९७) यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना क्रिकेटपटू विराट कोहली२. विराट कोहली (क्रिकेट) : भारतीय क्रिकेट संघाचा तिन्ही प्रकारांतील कर्णधार. उजव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू. जन्म पाच नोव्हेंबर १९८८. २००६मध्ये करिअरची सुरुवात. २००८मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजेत्या संघाचा कर्णधार.   

द्रोणाचार्य पुरस्कार :
१. सुभेदार चेनंदा अचैया कुट्टप्पा (बॉक्सिंग) : 
२. विजय शर्मा – वेटलिफ्टिंग : सध्या मीराबाई चानू हिचे प्रशिक्षक. 
३. ए. श्रीनिवास राव (टेबल टेनिस) 
४. सुखदेवसिंग पन्नू (अॅथलेटिक्स)
५. क्लॅरेन्स लोबो (हॉकी - जीवनगौरव) 
६. तारक सिन्हा (क्रिकेट - जीवनगौरव) 
७. जीवनकुमार शर्मा (ज्युडो - जीवनगौरव)
८. व्ही. आर. बिडू (अॅथलेटिक्स - जीवनगौरव)

अर्जुन पुरस्कार :
१. नीरज चोप्रा – अॅथलेटिक्स : ट्रॅक आणि फिल्ड अॅथलीट, तसेच भालाफेक खेळाडू. जन्म - २४ डिसेंबर १९९७ (पानिपत, हरियाणा). अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जनंतर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेला दुसरा भारतीय खेळाडू. विशेष योगदान : २०१६मध्ये पोलंडमध्ये आयोजित आयएएएफ यू २० जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक. या पदकाबरोबरच ज्युनिअर गटातील विक्रम प्रस्थापित. 

२. सुभेदार जिन्सन जॉन्सन (अॅथलेटिक्स) : ८०० आणि १५०० मीटरमधील धावपटू. जन्म - १५ मार्च १९९१ (कोझिकोडे, केरळ). विशेष योगदान – २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पुरुष १५०० मीटर प्रकारात सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय विक्रम. 

३. हिमा दास (अॅथलेटिक्स) : धावपटू. जन्म - नऊ जानेवारी २००० (ढिंग, नागांव, आसाम). विशेष योगदान – आयएएएफ वर्ल्ड अंडर २० अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. 

४. नेलकुर्ती सिक्की रेड्डी (बॅडमिंटन) : दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात कारकीर्द. जन्म - १८ ऑगस्ट १९९ (कोडाड, तेलंगणा). दक्षिण आशियायी स्पर्धेत दुहेरीत सुवर्णपदक. 

५. सुभेदार सतीशकुमार (बॉक्सिंग) : हौशी बॉक्सर. जन्म - चार मे १९८९. २०१४च्या आशियायी स्पर्धेत सुपर हेवीवेट श्रेणीत कांस्यपदक.  

६. स्मृती मंधाना (क्रिकेट) : जन्म - १८ जुलै १९९६ (मुंबई, महाराष्ट्र). उजव्या हाताने फलंदाजी करणारी खेळाडू. २०१७च्या महिला विश्वचषकस्पर्धेमध्ये दोन शतके. 

७. शुभंकर शर्मा (गोल्फ) : व्यावसायिक गोल्फर. जन्म - २१ जुलै १९९६

८. मनप्रीत सिंग (हॉकी) : जन्म – २६ जून १९९२ (जालंधर, पंजाब). २०११मध्ये १९व्या वर्षी भारतीय हॉकी संघासाठी खेळण्यास सुरुवात. २०१२च्या समर ऑलिंपिकमध्ये संघात सहभाग. ‘आशियाज ज्युनिअर प्लेअर ऑफ दी इयर’ किताबाचा मानकरी. 

९. सविता पुनिया (हॉकी) : जन्म – ११ जून १९९० (हरियाणा). गोलकीपर. २०१६च्या समर ऑलिंपिकमध्ये सहभाग. 

१०. कर्नल रवी राठोड (पोलो) : जन्म – नागौर, राजस्थान. सध्या ६१ कैवलरीत तैनात. जाकार्तामधील आशियायी स्पर्धेत पदक. 

राही सरनोबत११. राही सरनोबत (नेमबाजी) : जन्म – ३० ऑक्टोबर १९९० (कोल्हापूर, महाराष्ट्र). २००८पासून कारकिर्दीस सुरुवात. २०१८च्या आशियायी क्रीडा स्पर्धेत २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक. आशियायी स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी पहिलीच नेमबाज. 

१२. अंकुर मित्तल (नेमबाजी) : जन्म – ३० मार्च १९९२ (सोनिपत, हरियाणा). २०१८ला दक्षिण कोरियातील आयएसएसएफ जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत दुहेरीत सुवर्णपदक.  

१३. श्रेयसी सिंह (नेमबाजी) : २०१४मध्ये ग्लासगोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक.  

१४. मनिका बत्रा (टेबल टेनिस) : जन्म – १५ जून १९९५ (दिल्ली). एप्रिल २०१८च्या आकडेवारीनुसार भारतीय टेबल टेनिसमधील प्रथम मानांकित महिला खेळाडू. जागतिक क्रमवारीत ५८व्या स्थानावर. 

१५. जी. साथियान (टेबल टेनिस) : भारतीय टेबल टेनिसमध्ये प्रथम मानांकित पुरुष टेबल टेनिसपटू. जागतिक मानांकनात ५१व्या स्थानावर. 

१६. रोहन बोपण्णा (टेनिस) : जन्म – चार मार्च १९८० (बेंगळुरू, कर्नाटक). २००२पासून भारतीय डेव्हिस कप संघाचा सदस्य. एकेरीच्या जागतिक क्रमवारीत २१३व्या स्थानी, तर दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर. 

१७. सुमित मलिक (कुस्ती) :  फ्री-स्टाइल कुस्तीपटू  (१२५ किलो वजनी गट). जन्म – नऊ जानेवारी १९९३ (रोहतक, हरियाणा). २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक. २०१७ची आशियायी स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक. 

१८. पूजा कादियान (वुशू) : जन्म – एक ऑक्टोबर १९९१. कोलंबियातील नवव्या जागतिक खेळ स्पर्धेत रौप्यपदक. आजवर आशियायी आणि जागतिक स्तरांवरील स्पर्धांत सुवर्णपदके. 

१९. अंकुर धामा - पॅरा अॅथलेटिक्स : वयाच्या पाचव्या वर्षी दृष्टी गेली असतानाही जिद्दीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव गाजवणारा अॅथलीट. जन्म – खेकेरा, उत्तर प्रदेश. ८००, १५०० आणि ५००० मीटर प्रकारांत सहभाग. २१ वर्षांच्या अंकुरने आजवर राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. 

२०. मनोज सरकार - पॅरा बॅडमिंटन : छत्तीसगडचा ३३ वर्षीय मनोज शरीराने अपंग असला, तरी वयाच्या पाचव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळत आहे. आजवर आशियायी पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मनोजने पदके मिळवली आहेत. 

ध्यानचंद पुरस्कार :
१. सत्यदेव प्रसाद (तिरंदाजी) 
२. भरतकुमार छेत्री (हॉकी) : जन्म – १५ डिसेंबर १९८१ (कालिमपोंग). भारतीय पुरुष हॉकी संघाचा तो गोलरक्षक आहे.

३. बॉबी अलोयसिस (अॅथलेटिक्स) : जन्म – २२ जून १९७४ (चम्पेरी, केरळ). भारतीय आणि दक्षिण आशियायी खेळांमध्ये १९९५ ते २०१२च्या दरम्यान उंच उडीचा विक्रम. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकप्राप्त. 

४. दादू दत्तात्रेय चौगले (कुस्ती) : कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा येथील दत्तात्रय चौगले यांच्या शेतकरी कुटुंबात जन्म. वयाच्या १५व्या वर्षी कोल्हापुरातील शाहूकालीन मोतीबाग तालमीत दाखल. तिथेच कुस्तीचा सराव सुरू केला. अल्पावधीत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा नावलौकिक जगभर. पाच नोव्हेंबर १९७० रोजी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अजिंक्यपद. १९७१ साली अलिबाग येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाचा मान. न्यूझीलंडमधील राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई. तीन मार्च १९७३ रोजी मुंबईत रुस्तम-ए-हिंद हा मानाचा किताब मिळवला.

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार :
१. उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन पुरस्कार राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड कॉर्पोरेटला मिळाला आहे. 
२. सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहनासाठी जेएसडब्ल्यू स्पोर्टस् आणि विकासासाठी खेळ या संकल्पनेसाठी ईशा आउटरिचची निवड करण्यात आली आहे. 
३. मौलाना अबुल कलाम आझाद चषक हा पुरस्कार अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाला देण्यात आला आहे. 

(सोबतचा व्हिडिओ पाहावा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search