Next
हडपसर येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
प्रेस रिलीज
Tuesday, January 09, 2018 | 02:47 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्रातील आघाडीच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सपैकी एक असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने हडपसर येथे नवीन हॉस्पिटल सुरू करून आरोग्य सेवा क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. या नवीन सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे रूग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.

सह्याद्री हॉस्पिटल्स ही महाराष्ट्रातील आघाडीची हॉस्पिटल्सची साखळी असून, सध्या येथील डेक्कन जिमखाना, नगर रोड, कोथरूड, बिबवेवाडी, कसबा पेठ आणि हडपसर या भागांत; तसेच कराड आणि नाशिक या शहरांतही कार्यरत आहे.

‘या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये हृदयरोग चिकित्सा, अतिदक्षता (क्रिटिकल केअर मेडिसिन), आपत्कालीन चिकित्सा (इमर्जन्सी मेडिसिन), अंतस्त्राव विज्ञान (एंडोक्रिनॉलॉजी), कान नाक घसा, जठरांत्रमार्ग रोगचिकित्सा (गॅस्ट्रोएंटोरोलॉजी), सामान्य शस्त्रक्रिया (जनरल सर्जरी), प्रौढ रोगोपचार (इंटर्नल मेडिसिन), वैद्यकीय कर्करोग चिकित्सा (मेडिकल आँकॉलॉजी) आणि रक्तोपचार (हेमॅटॉलॉजी) या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवांचा समावेश असणार आहे,’ अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ आणि सह्याद्री हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त आपटे यांनी दिली.  

सह्याद्री हॉस्पिटल्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. जयश्री आपटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुर वर्मा आणि इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते.

याव्यतिरिक्त या हॉस्पिटलतर्फे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, नवजात शिशु चिकित्सा (निओनॅटोलॉजी), मूत्रपिंड विकार चिकित्सा (नेफ्रॉलॉजी), मेंदूविकार चिकित्सा (न्यूरॉलॉजी), मेंदूशस्त्रक्रिया (न्यूरोसर्जरी), पोषण आणि आहार शास्त्र, प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोगशास्त्र, अस्थिरोग चिकित्सा (ऑर्थोपेडिक्स), बालरोग शस्त्रक्रिया, बालरोगचिकित्सा, भौतिकोपचार (फिजिओथेरपी) आणि पुनर्वसन सेवा (रिहॅबिलिटेटिव्ह सर्व्हिसेस), फुप्फुसरोग चिकित्सा (पल्मोनोलॉजी), किरणोपचार कर्करोग चिकित्सा (रेडिएशन आँकॉलॉजी), जठारांत्र मार्ग शस्त्रक्रिया (सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी), शस्त्रक्रियात्मक कर्करोग उपचार (सर्जिकल ऑन्कोलॉजी), मूत्रसंस्था रोग चिकित्सा (युरॉलॉजी) आणि रक्तवाहिन्यांसंबंधी चिकित्सा (व्हॅस्क्युलर सर्जरी) या सेवाही दिल्या जाणार आहेत.  

या नवीन अद्ययावत सुविधेद्वारे सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटीज सेवा एकाच छताखाली उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उच्च दर्जाची देखभाल, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी आरामकक्ष, ग्राहकांना सर्व मदत एकाच ठिकाणी मिळवून देणारा कक्ष, रुग्णाच्या कुटुंबियांसाठी समुपदेशन कक्ष, कार्यक्षम टीम, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर्स, बाह्य रुग्णांसाठीचा विभाग (आउट पेशंट डिपार्टमेंट), समर्पित आरोग्य तपासणी क्षेत्र, डे केअर सर्जरी युनिट, एंडोस्कोपी सूट, अतिदक्षता विभाग, हाय डिपेंडन्सी युनिट, नवजात शिशु दक्षता विभाग, प्रसूतिकक्ष, कॅफेटेरिया आणि इन-पेशंट रूम्स आणि इकॉनॉमी वॉर्ड्स अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल.

औषध विभाग, रुग्णवाहिका, प्रयोगशाळा, रक्त संग्रह, आपत्कालीन कक्ष, कॅथलॅब, एमआरआय, डिजिटल एक्स रे, अल्ट्रा साउंड आणि कलर डॉप्लर, इकोकार्डिओग्राफी, इइजी, इएमजी, पॅथॉलॉजी लॅब, न्यूक्लिअर मेडिसिन-पेट सीटीस्कॅन अशा सुविधांही येथे असतील.

डॉ. चारुदत्त म्हणाले, ‘१९९४मध्ये पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी म्हणून पुण्यात सुरू झालेले सह्याद्री हॉस्पिटल सामान्य लोकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा आणि सुविधा पुरविण्यासाठी आघाडीवर आहे. भारतात नवनवीन वैद्यकीय तंत्रज्ञान येत असताना प्रतिभावान वैद्यकीय तज्ञांची उपलब्धता, सक्रिय संस्था आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होणारे केंद्र म्हणून पुणे उदयास आले. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविणारे शहर म्हणून पुण्याची ओळख बनविण्यात सह्याद्री हॉस्पिटलचे मोठे योगदान आहे. म्हणूनच हडपसर येथे सुरू होत असलेले नवीन हॉस्पिटल हा फक्त आमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण शहरासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.’

वर्मा म्हणाले, ‘पहिल्यांदाच पुण्यामध्ये आरोग्य क्षेत्रात उत्तम पायाभूत सुविधा, अजोड कौशल्य व अद्यावत सेवा यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळेल. या संपूर्ण सुविधांची संकल्पना करताना आम्ही रुग्ण, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांच्या कामाचे कार्यान्वयन तसेच रुग्णाचे कुटुंबीय जे या उपचार प्रक्रियेत महत्त्वाचे भाग ठरतात. या सर्वांना केंद्रस्थानी ठेवले आहे. रुग्णास घरासारखेच वातावरण वाटावे म्हणून प्रत्येक छोट्या गोष्टीवर विचार करण्यात आला आहे. या उच्च दर्जाच्या विशेष सुविधेची क्षमता १५० खाटांची असून, यामुळे मगरपट्टा सिटी, अ‍ॅमनोरा टाऊनशिप, हडपसर, खराडी, कोंढवा आणि वाघोली भागातील रहिवाशांना अद्यावत वैद्यकीय सेवांचा लाभ मिळेल. हे नवीन हॉस्पिटल सोलापूर महामार्गावर असल्याने इतर राज्यातून व शहरांतून येणार्‍या रूग्णांसाठी सोयिस्कर ठरेल.’

डॉ. जयश्री आपटे म्हणाल्या, ‘सह्याद्री हॉस्पिटल नेहमीच भारतातील व जगातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीच्या बरोबरीने राहिले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ चिकित्सक आणि कुशल कर्मचारी वर्ग यांच्या साहाय्याने आम्ही अधिक सुधारित वैद्यकीय परिणाम व रुग्णांची जलद रोगमुक्तता प्राप्त करण्यास यशस्वी ठरले आहोत. या नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे पुण्यातील आरोग्य सेवा राष्ट्रीय नकाशावर येण्यास मदत होईल.​’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search