Next
बीएनसीएच्या तीन विद्यार्थिनींना देशपातळीवर तिसरा पुरस्कार
BOI
Monday, November 19, 2018 | 12:44 PM
15 0 0
Share this article:

बीएनसीएच्या विजेत्या विद्यार्थिनी (डावीकडून) ऐश्वचर्या शेंडगे, सोनाली इंदलकर आणि वृंदा पानसे.

पुणे : लहान मुलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या आराखड्यासाठी अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील तीन विद्यार्थिनींनी तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. बीएनसीएच्या पर्यावरण वास्तूरचना अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनी असलेल्या सोनाली इंदलकर, वृंदा पानसे आणि ऐश्वार्या शेंडगे या तीन विद्यार्थिनींनी हे यश मिळवले आहे. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या एकशेदहा गटांपैकी पहिल्या पाच गटांमध्ये बीएनसीएच्या दोन गटांना स्थान मिळाले. त्यापैकी एका गटाला विशेष उल्लेखनीय म्हणून गौरवण्यात आले. 

हॉसमॅक या संस्थेतर्फे ऑल इंडिया हेल्थकेअर आर्किटेक्चरल स्टुडंट्स डिझाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये मुलांसाठी रुग्णालय व संशोधन केंद्र उभारण्याचा विषय देण्यात आला होता. यात तिसरा पुरस्कार मिळालेल्या बीएनसीएच्या तिघींच्या गटाला १५ हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. विजयी स्पर्धकांना बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, तसेच प्रा. सुजाता कर्वे, प्रा. सोनाली राजवाडे, प्रा. प्राजक्ता कुलकर्णी, प्रा. नम्रता धामणकर, प्रा. निधी दीक्षित आणि प्रा. राहूल नवले यांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search